Chris Gayle celebrated Navratri in Jodhpur During Legends League Cricket  esakal
क्रीडा

VIDEO : ख्रिस गेलने देखील साजरी केली स्पेशल गरबा नाईट

अनिरुद्ध संकपाळ

Chris Gayle Special Garba Night : भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि वेस्ट इंडीजचा माजी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यांनी जोधपूर येथे नवरात्री सेलिब्रेशन केले. हे दोघेही लेजंड लीग क्रिकेट स्पर्धेनिमित्त जोधपूर येथे आले होते. यावेळी या क्रिकेटपटूंनी देशातील सर्वात मोठ्या उत्सव असलेल्या नवरात्रीचा देखील आनंद घेतला. ख्रिस गेल तर पारंपरिक स्पेशल गरबा नाईटच्या तालावर थिरकला. गेलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्रिकेटपटू सहसा त्यांच्या कीटमध्ये वावरत असतात. मात्र सध्या त्यांनी पारंपरिक वेशभुषेत गरबा खेळत सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी सध्या गुजरात जायंट्सचा संघ जोधपूरमध्ये आला आहे. या संघाचे नेतृत्व विरेंद्र सेहवाग करत असून संघ प्ले ऑफसाठी पात्र देखील झाला आहे. गुजरात जायंट्स बरकतुल्ला खान स्टेडियमवर सोमवारी एलिमनेटरचा सामना खेळणार आहे.

गुजरात जायंट्सकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलने दोन सामन्यात 15 आणि 68 धावांची खेळी केली. या दोन्ही खेळी त्याने भिलवारा किंग्जविरूद्धच्या सामन्यात केल्या. गुजरात जायंट्स संघात विरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांच्याशिवाय पार्थिव पटेल, केव्हिन ओब्रायन, ग्रॅमी स्वान, रिचर्ड लिव्ही आणि अंजता मेंडीस या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House Lottery: म्हाडा 'त्या' विजेत्यांची पुन्हा लॉटरी काढणार! कारण आलं समोर

Wakad Sangvi News : 'झाडू' हाती घेत डॉक्टरांनी केली स्वच्छता; सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई नसल्याने वैद्यकीय अधिकारीच सफाईत

Graduate Constituency Election : खडकवासला मतदार संघात शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीला सुरुवात; डॉ. माने यांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा सकल हिंदू समाजाकडून आरोप

बाबो 150 कोटींची जाहिरात ! अ‍ॅटलीच्या दिग्दर्शनाखाली रणवीर सिंग, श्रीलीला आणि बॉबी देओल एकत्र

SCROLL FOR NEXT