sakal
क्रीडा

जैवसुरक्षा वातावरणात ख्रिस गेलची घुसमट

उर्वरित आयपीएलला सोडचिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा

दुबई : पंजाब किंग्जचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून तडकाफडकी माघार घेतली आहे. आयपीएलसाठी तयार करण्यात आलेल्या जैवसुरक्षा वातावरणात घुसमट होत असल्याने माघार घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. गेल गेल्या महिन्यात कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) स्पर्धेत खेळत होता. त्या वेळीही तो जैव सुरक्षा वातावरणामध्ये होता. त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी तयार करण्यात आलेल्या जैवसुरक्षा वातावरणात त्याने थेट प्रवेश केला होता. सततच्या या वातावरणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून गेलने उर्वरित आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘गेल्या काही महिन्यांपूर्वी मी आधी वेस्ट इंडीज क्रिकेटच्या जैव सुरक्षा वातावरणाचा भाग होतो. त्यानंतरच्या सीपीएलसाठीही मला जैविकरणामध्ये राहावे लागले. आणि आता पुन्हा मी आयपीएलसाठीच्या जैव सुरक्षा वातावरणात आहे. माझी घुसमट होऊ लागली असून माझ्या मानसिक स्वास्थ्यावरही त्याचा परिणाम होत असल्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत मला स्वत:ला रिफ्रेश करणे गरजेचे असल्याने मी माघार घेत आहे’, असे गेलने स्पष्ट केले आहे.

"मला सध्या मानसिक विश्रांतीची गरज आहे. वेस्ट इंडीजला आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या ताजातवाना असणे गरजेचे आहे. पंजाब किंग्ज संघाने मला ब्रेक घेण्याची परवानगी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. उर्वरित स्पर्धेसाठी पंजाब संघाला माझ्या शुभेच्छा!" ख्रिस गेल, वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : कोल्हापुरात खासगी बसला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT