Hardik pandya Instagram
क्रीडा

पांड्यानं शेअर केला नताशासोबतचा फोटो; नेटकऱ्यांना दिसली गूड न्यूज

सकाळ डिजिटल टीम

ख्रिसमसच्या दिवशी (Christmas 2021) हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) खास फोटो शेअर केलाय. या फोटोत तो फॅमिलीसोबत ख्रिसमसचा आनंद साजरा करताना पाहायला मिळते. पत्नी नताशा स्टॅन्कोविच (Natasa Stankovic) आणि मुलगा अगस्त्य (AgastyaPandya) सोबतचा त्याच्या फोटोवर खास प्रतिक्रिया उमटताना दिसताहेत. हार्दिक पांड्यानं ख्रिसमस दिवशी गोड बातमी दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. नेटकऱ्यांना पांड्याचा फॅमिली फोटो चांगलाच भावला असून रेड ड्रेसमध्ये दिसत असलेली नताशा लवकरच गूड न्यूज देणार आहे, असा अंदाज त्यांनी लावला आहे.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पाठिच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो शंभर टक्के तंदुरुस्त होऊन लवकरच टीम इंडियात पुन्हा खेळताना दिसेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. पण ही गोड बातमी येण्यापूर्वी पांड्यानं शेअर केलेल्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या फोटोवरुन नेटकरी त्याच्याकडे गूड न्यूज असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

2020 मध्ये हार्दिक पांड्यानं नवीन वर्षांच्या सुरुवातीलात चाहत्यांना खूशखबर दिली होती. त्याने हटके अंदाजात एका क्रुजमध्ये नताशाला लग्नासाठी प्रपोज केल होते. या गोष्टीनंतर दोघांच्या प्रेमाची गाडी नव्या इनिंगला सुरुवात करणार हे पक्के झाले. लोक याची चर्चा करत असताना पांड्यानं गूड न्यूजही दिली. तत्पूर्वी पांड्य आणि नताशा यांचे कुटुंबियांसोबत पूजा करतानाचे काही फोटो समोर आले होते. गेल्या वर्षी 30 जुलै रोजी नताशाने मुलाला जन्म दिला होता. हार्दिक-नताशाने आपल्या पहिल्या मुलाच नाव अगस्त्या असं ठेवलं आहे. या तिघांत आता चौथा सदस्य येणार असल्याची चर्चा पांड्यानं शेअर केलेल्या फोटोवरुन सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT