Shikha-Pandey-Swing-Bowled 
क्रीडा

Video: खतरनाक स्विंग.. चेंडू टप्पा पडताच अचानक आत वळला अन्..

फलंदाजी करणाऱ्या हेलीला काही कळण्याआधीच स्टंप उडाला

विराज भागवत

फलंदाजी करणाऱ्या हेलीला काही कळण्याआधीच स्टंप उडाला

INDW vs AUSW: भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात पराभव झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ११८ धावा केल्या होत्या. पूजा वस्त्रकार (३७*), कर्णधार हरमनप्रीत कौर (२८) आणि दीप्ती शर्मा (१६) वगळता इतर कोणीही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठून शकले नाही. ११९ धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियन महिला संघाने ५ चेंडू आणि ४ गडी राखून पूर्ण केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर एक खतरनाक स्विंग पाहायला मिळाला.

भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिने गोलंदाजीच्या डावाला सुरूवात केली. अलिसा हेली हिने तिच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत डावाची दमदार सुरूवात केली. पण पुढच्याच चेंडूवर अलिसा क्लीन बोल्ड झाली. शिखा पांडेने टाकलेला चेंडू अंदाजे सहाव्या स्टंपच्या रेषेत होते. तेथून टप्पा पडून चेंडू अचानक इन स्विंग झाला. चेंडू नक्की कसा येतोय हे कळेपर्यंत अलिसा त्रिफळाचीत झाली होती.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, भारताकडून पूजा वस्त्रकारच्या नाबाद ३७ धावांच्या खेळीमुळे संघाने कशीबशी शंभरीपार मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना बेथ मूनीने ३४ धावांची खेळी केली. ताहिला मॅकग्रा हिने मात्र एक बाजू लावून धरली. तिने नाबाद ४२ धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिच्या या खेळीसाठी तिला सामनावीराचा किताब देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा निर्णय! आता मुले, तरुण, महिला, ज्येष्ठांना कोणत्याही खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार; ४५८० रुग्णालये, २३९९ आजारांचा समावेश, वाचा...

फक्त १० मिनिटांत तयार करा प्रोटीन-पनीर-कॉर्न सॅलड – सकाळी ताजेतवाने राहण्यासाठी आतापर्यंतची सर्वात सोपी रेसिपी!

Panchang : १ एप्रिल 2026 पंचांग! शुभ मुहूर्त, राहू काळ व आजचे संपूर्ण दिनविशेष

आजचे राशिभविष्य - 1 एप्रिल 2026

मोठी बातमी! गॅस मिळेना, सोलापुरातील १० हजार रिक्षा थांबल्या; माजी आमदार नरसय्या आडम मैदानात, पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा, वाचा...

SCROLL FOR NEXT