Colin Munro Viral Video  
क्रीडा

Colin Munro Viral Video : क्रिकेटपटूचं ट्रेनिंग अन् बॉल बॉयने पकडला अप्रतिम कॅच; न्यूझीलंड मुनरोचा व्हिडीओ एकदा पाहाच

Colin Munro Viral Video : सध्या पाकिस्तानमध्ये टी-२० लीग 'पाकिस्तान सुपर लीग' खेळवली जात आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या लीगकडे लागल्या आहेत.

रोहित कणसे

Colin Munro Viral Video Latest News : सध्या पाकिस्तानमध्ये टी-२० लीग 'पाकिस्तान सुपर लीग' खेळवली जात आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या लीगकडे लागल्या आहेत. वेगवेगळ्या देशातील अनेक दिग्गज खेळाडू या लीग मध्ये खेळत आहेत. या लीगमध्ये 4 मार्च रोजी इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर जल्मी यांच्यात सामना झाला. या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड संघाच्या एका खेळाडूचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक खेळाडू सुरू सामन्यादरम्यान बॉल बॉयला कॅच पकडण्याचं ट्रेनिंग देताना दिसून आला.

न्यूझीलंडचा क्रिकेटर कोलिन मुनरो हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जातो. तर व्हायरल होत असेल्या व्हिडीओमध्ये मुनरो हा सामन्यादरम्यान बॉलबॉयला बाउंड्रीवर कॅच कसा पकडायचा याचं प्रशिक्षण देताना दिसत आहे.

नेमकं काय झालं?

सामन्यात इस्लामाबाद संघ क्षेत्ररक्षण करत असताना पेशावरच्या एका फलंदाजाने फाइन लेगवर शॉट खेळला, जो बाँडरीच्या बाहेर गेला. हा सिक्सर थेट बॉल बॉयच्या हातात गेला. मात्र या बॉल बॉयला तो कॅच पकडता आला नाही. यानंतर तो बॉलबॉय चांगलाच निराश झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर मुनरो हा काही काळासाठी त्या मुलाचा प्रशिक्षक बनला आणि त्याने त्या मुलाला झेल कसा पकडायाचा याचं ट्रेनिंग दिलं. काही वेळाने पुन्हा या मुलाकडे चेंडू आला आणि त्याने यशस्वीरित्या कॅच पकडला देखील. हा कॅच पकडल्यानंतर बॉल बॉय आणि मुनरो दोघेही खूप आनंदी झाले. मनरोने त्या कॅच पकडणाऱ्या मुलाला मिठी देखील मारली.

मुनरेच्या या कृतीचं सोशल मीडियावर तुफान कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इस्लामाबादने चार गडी गमावून १९६ धावा केल्या. यानंतर पेशावर संघाला २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १६७ धावा करता आल्या. इस्लामाबादने हा सामना २९ धावांनी जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT