Commonwealth Games 2022 Opening Ceremony sakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : भारताचे सामने केव्हा अन् कोठे पाहाल?

उद्‌घाटन सोहळ्याची भारतीय वेळ व प्रक्षेपण वाहिनी माहिती आहे का ?

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 Opening Ceremony : इंग्लंडमध्ये तब्बल 20 वर्षांनंतर आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. 28 जुलैला उद्‍घाटन होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. स्पर्धेतील 25 क्रीडा प्रकारांत 72 देशांतील तब्बल 5052 खेळाडू सहभागी होणार असून भारताने या क्रीडा स्पर्धेसाठी 215 खेळाडूंचे पथक पाठविले आहे. दुखापतीमुळे भालाफेकपटू नीरज चोप्राने अंतिम वेळी माघार घेतल्यामुळे दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू भारतीय पथकाची ध्वजधारक असणार आहे.

  • या स्थळांवर होणार स्पर्धा

    बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलँड विभाग, ग्रेटर लंडन

  • ॲलेक्झँडर स्टेडियमवर रंगणार उद्‌घाटन सोहळा

    बर्मिंगहॅममधील ॲलेक्झँडर स्टेडियममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा उद्‌घाटन सोहळा रंगणार आहे. येथे ३० हजार क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत या मानाच्या क्रीडा स्पर्धांचा श्रीगणेशा होईल. म्युझिक बॅंड डुरॅन डुरॅन व रॉक बँड ब्लॅक सबाथ यांचा कलाविष्कार या सोहळ्यात आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहे.

उद्‌घाटन सोहळ्याची भारतीय वेळ व थेट प्रक्षेपण वाहिनी

  • मध्यरात्री ११.३० पासून सुरुवात - सोनी टेन, सोनी सिक्स, डीडी स्पोर्टस्‌

या खेळाडूंवर असणार नजर

  • ॲडम पिटी (जलतरण)

  • इमा मॅकीनोन (जलतरण)

  • कोडी सिम्पसन (जलतरण)

  • पँडलेला रिनोंग (डायव्हिंग)

  • आंद्रे ग्रेस (ॲथलीट)

  • शेली फ्रेझर (ॲथलीट)

  • पॉल कोल (स्क्वॉश)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

SCROLL FOR NEXT