Srihari Nataraj sakal
क्रीडा

Srihari Nataraj : श्रीहरी नटराज कडून स्विमिंगमध्ये भारताला सुवर्णपदकाची आशा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात २५.५२ सेकंदांची वेळ नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Kiran Mahanavar

Srihari Nataraj Commonwealth Games 2022 : भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजने रविवारी येथील २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात २५.५२ सेकंदांची वेळ नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळं संपूर्ण भारतीयांच्या नजरा लक्ष श्रीहरी नटराजच्या कामगिरीवर असणार आहे.

१०० मीटर बॅकस्ट्रोकच्या स्पर्धेत त्याला ७ व्या स्थानावर समाधान मानावे लागल्यानंतर नटराज नाराज दिसत होता; मात्र त्यानंतर त्याने ५० मीटरमध्ये दमदार पुनरागमन केले; तर दुसरीकडे, भारताचा अव्वल जलतरणपटू साजन प्रकाश पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत, १:५८.९९ सेकंद अशी वेळ नोंदवत चौथ्या स्थानावर राहिला, ज्यामुळे त्याला राखीव यादीत स्थान देण्यात आले.

भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत सहा पदके जिंकली असून ही सर्व पदके वेटलिफ्टिंग मधून आली आहे. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. बिंदियारानी देवीने महिलांच्या 55 किलो वजनी गटात आणि संकेत सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. यानंतर भारताचा युवा सेन्सेशन जेरेमी लालरिनुंगा याने 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 131 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत. चौथ्या दिवशी पण वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळण्याची आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT