Gururaja Pujari Sakal
क्रीडा

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसरं पदक जिंकून देणारा गुरूराजा पुजारी कोण?

दत्ता लवांडे

Commonwealth Games 2022 : भारतीय वेटलिफ्टर गुरूराजा पुजारी याने राष्ट्रकुल स्पर्धेत 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. सांगलीच्या संकेत सरगर नंतर गुरूराजा हा वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी दुसरं पदक जिंकणारा ठरला आहे. पुजारीने 269 किलो वजन उचलून पदक जिंकले असून पुजारीने स्नॅचमध्ये 118 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 151 किलो वजन उचलले.

गुरूराजा पुजारी हा कर्नाटकातील उडीपी जिल्ह्यातील एक वेटलिफ्टर असून त्याला पी. गुरूराजा या नावानेही ओळखले जाते. त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरूषांच्या ५६ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते. त्याचा जन्म १५ ऑगस्ट १९९२ रोजी उडीपी जिल्ह्यातील किंडापूरा या गावात झाला आहे. महाबाला पुजारी असं त्यांच्या वडिलांचं नाव असून ते ट्रक ड्रायव्हर आहेत. त्याला चार भावंड असून गुरूराजा हा त्याच्या कुटुंबात सर्वांत लहान आहे. त्याचे लहानपण खूप बिकट परिस्थितीत गेले पण त्यांने आपल्या खेळावरील प्रेम कमी केले नाही.

पी. गुरूराजाने कर्नाटकमधील उजीरे येथील एसडीएम महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. तो सुरूवातीला सुशीलकुमार पासून प्रेरणा घेत आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरूवात केली होती पण त्याचे प्रशिक्षक राजेंद्र प्रसाद यांनी त्याला सल्ला दिल्याने त्याने वेटलिफ्टिंग करायचं ठरवलं होतं.

पी. गुरूराजाची आत्तापर्यंतची कामगिरी

• वर्ष 2016 मध्ये, गुरुराजा पुजारीने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 56 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

• 2017 मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये 56 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

• गुरुराजाने 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकले.

• गुरुराजा पुजारीने 2021 कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये 61 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

SCROLL FOR NEXT