Commonwealth Games 2022 esakal
क्रीडा

Commonwealth 2022: आईने शिवण काम करत घर चालवलं, लेक बनलाय भारताचा गोल्डन बॉय

भारतीय वेटलिफ्टर अचिंता शिउली बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

धनश्री ओतारी

भारतीय वेटलिफ्टर अचिंता शिउली बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. यासह भारताने सहावे पदक जिंकले आहे. गोल्डन बॉय अचिंता शिउलीवर क्रिडा जगताता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंतचा अचिंता शिउलीचा प्रवास खुप खडतर आहे. शिलाई काम करत आई घर चालवत होती. तर वयाच्या ११ व्या वर्षीच वडीलांचे छत्र हरपले. (Commonwealth Games 2022 who is weightlifter achinta sheuli who won 3rd gold for india)

अचिंता शिउलीने वयाच्या १० व्या वर्षी वेटलिफ्टिंग क्षेत्रात प्रवेश केला. विशेष म्हणजे, अचिंताने आपल्या भावासोबत जिममध्ये वेळ घालवून याची सुरुवात केली, तिथे तो फक्त सिट-अप आणि डॉन (विशिष्ट पुशअप्स) करत मारत असे.

अचिंताप्रमाणेच त्याचा भाऊ आलोकला देखील वेटलिफ्टर बनायचे होते. मात्र, २०१३ मध्ये वडिलांचे निधन झाले. वडीलांचे छत्र हरपल्यानंतर आलोकला आपले स्वप्न हे स्वप्नच ठेवावे लागले. एकिकडे घर चालवण्यासाठी अचिंतच्या भावाने स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला तर आई शिवन काम सुरू केलं.

या सगळ्यात अचिंता त्याच स्वप्नं जगत राहिला आणि त्याचे स्वतःचेच नव्हे तर भावाचंही स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. गेल्या वर्षी ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या शिऊलीने तिसऱ्या प्रयत्नात दोन्ही सर्वोत्तम लिफ्ट्स केल्या.

सुवर्ण पदक जिंकल्यानंतर शिउलीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी सुवर्ण जिंकल्यामुळे खुप आनंदी आहे. या पदकासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझा भाऊ, आई, माझे प्रशिक्षक आणि सैन्याच्या बलिदानामुळे मला हे पदक मिळाले, ही माझ्या आयुष्यातील पहिली मोठी स्पर्धा होती आणि हा टप्पा गाठल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. हे पदक मला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मदत करेल. आता इथून मागे वळून पाहणार नाही.

माझे हे यश . मी हे माझे दिवंगत वडील, माझी आई आणि माझे प्रशिक्षक विजय शर्मा यांना समर्पित करू इच्छितो. माझे प्रशिक्षक मला नेहमी स्वतःच्या मुलासारखे वागवायचे आणि जेव्हाही माझ्याकडून चूक झाली तेव्हा ते कान धरुन शिकवायचे. अशी भावना शिउलीने व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

SCROLL FOR NEXT