SA vs IND Team India esakal
क्रीडा

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत संभ्रम; CSAने देशांतर्गत स्पर्धा केली रद्द

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत संभ्रम; दक्षिण आफ्रिकेने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा केली रद्द

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (SA vs IND) कसोटी मालिकेला येत्या 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे. मात्र यापूर्वीच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे दौऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या भारतीय संघ जोहान्सबर्गमध्ये कसोटी मालिकेसाठी कसून सराव करत आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (Cricket South Africa) रविवारी देशांतर्गत खेळली जाणारी चार दिवसांची फ्रेंचायजी मालिका रद्द केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील ही मोठी स्पर्धा आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या काही आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता भारतीय संघातील (Team India) खेळाडूंच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. (SA vs IND)

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (Cricket South Africa) प्रसिद्ध केलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'देशांतर्गत स्पर्धा या बायो बबलच्या बाहेर आयोजित केल्या जात होत्या. त्यामुळे क्रिकेट बोर्डाने पाचव्या फेरीतील सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे डिव्हिजन 2 मधील सामने 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर यादरम्यान खेळले जाणार होते. स्थगित केलेला देशांतर्गत सामन्यांचे आयोजन पुन्हा पुढच्या वर्षी केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT