Controversy over Anushka Sharma Present on Ground
Controversy over Anushka Sharma Present on Ground  esakal
क्रीडा

IND vs SL : अनुष्का प्रेक्षक गॅलरीतून मैदानात अवतरल्याने वाद

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि श्रीलंका याच्यातील पहिली कसोटी मोहालीत सुरू झाली. हा विराट कोहलीचा 100 वा कसोटी (Virat Kohli 100th Test) सामना असल्याने या कसोटीला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहलीचा शंभराव्या कसोटीसाठी विशेष गौरव केला. यावेळी त्याला शंभरावी ब्लू बॅगी देखील देण्यात आली. (Controversy over Anushka Sharma Present on Ground)

विशेष म्हणजे विराटला प्रेक्षक गॅलरीतून कायम साथ देणारी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आज सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर अवतरली. ज्यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड विराट कोहलीला शंभराव्या कसोटीसाठी ब्लू बॅगी देत होते त्यावेळी अनुष्काही विराटच्या बाजूला उभी होती. यावर अनेक सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यावर एका ट्विटर युजरने इशांत शर्माचा शंभरावी कसोटी खेळल्यानंतरचा फोटो शेअर केला. यात त्याची पत्नी देखील मैदानावर उपस्थित होती. या युजरने 'जास्त गळे काढू नका इशांत शर्माची पत्नी देखील शंभराव्या कसोटीदरम्यान मैदानावर उपस्थित होती. फक्त विराट कोहलीची आई यावेळी हवी होती.' असे कॅप्शन दिले.

दरम्यान, विराट कोहलीने हा एक विशेष क्षण असल्याचे सांगितले. तसचे तो तीन क्रिकेट फॉरमॅट खेळून देखील मी 100 कसोटी सामने खेळू शकलो ही पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणा असेल असे म्हणाला.

विराट बीसीसीआयने गौरव केल्यानंतर 'हा माझ्यासाठी एक मोठा क्षण आहे. माझी पत्नी आणि माझा भाऊ इथे आहे. सर्वांना अभिमान वाटतोय. शेवटी हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे हे तुमच्याशिवाय घडले नसते. बीसीसीआयचे देखील आभार. सध्याच्या तीन फॉरमॅटमधील क्रिकेट सामने पाहता तसेच आयपीएल देखील आहेच तरीही मी 100 कसोटी सामने खेळलो. हे पुढच्या पिढीने हे माझ्याकडून घ्यावे.' असे वक्तव्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT