Argentina vs Chile Copa America Twitter
क्रीडा

COPA : मेस्सीच्या गोलला चिलीकडून मिळालं प्रतिउत्तर (VIDEO)

अतिरिक्त सात मिनिटांच्या वेळेत अर्जेंटिनाने काही संधी निर्माण केल्या, पण त्यांना विजयी गोल नोंदवता आलाच नाही.

सुशांत जाधव

Copa America Argentina vs Chile : कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi ) गोल चिलीच्या एडुआर्डो वर्गासने (Eduardo Vargas) व्यर्थ ठरवला. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेल्या अर्जेंटिनाला चिले विरुद्धच्या सामन्यात 1-1 असे बरोबरीत समाधान मानावे लागले. सामन्याच्या पहिल्या हाफमधील 32 व्या मिनिटात अर्जेंटिनाला फ्रि किक मिळाली. अपेक्षेप्रमाणे मेस्सीने त्याचे गोलमध्ये रुपांतर करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवले. (Copa America 2021 ARG vs CHI Lionel Messi Scores as Argentina Play Another Draw Against Chile)

दुसऱ्या हाफचा खेळ सुरु झाल्यानंतर चिलीच्या संघाकडूनही आक्रमक खेळ पाहायला मिळाला. 57 व्या मिनिटाला चिलीच्या प्रयत्नांना यश आले. 54 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस टॅग्लियाफिको (Nicolás Tagliafico) ने चिलेच्या आर्टुरो विडाल (Arturo Vidal) याला धक्का दिला. व्हिडिओ असिस्टंट रेफ्रीने अधिक वेळ घेत (video assistant referee) चिली संघाला पेनल्टी दिली. पेनल्टीमध्ये विडालने मारलेला फ्री किकवरील फटका अर्जेंटिनाचा गोलकिपर एमी मार्टिनेझ (Emi Martinez) अडवला. पण एडुआर्डो वर्गासने गोलीच्या हाताला लागून आलेला फटका पुन्हा गोल पोस्टमध्ये डागत संघाला 1-1 अशी बरोबरी करुन दिली. अतिरिक्त 7 मिनिटांच्या वेळेत अर्जेंटिनाने काही संधी निर्माण केल्या. पण त्यांना विजयी गोल डागण्यात अपयश आले.

अर्जेंटिनाचा संघ बोलिव्हिया, चिली, उरुग्वे आणि पेराग्वे या देशांसह अ गटात आहे. अर्जेंटिना आणि चिली यांच्यातील गटातील हा पहिलाच सामना होता. तो 1-1 असा अनिर्णित राहिला. दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक पाँइट मिळाला असून अर्जेंटिना गुणतालिकेत टॉपलाच आहे. नॉकआउटमध्ये खेळताना दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fire in apartment at Parliament area : मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अन् अनेक खासदारांची निवासस्थानं असलेल्या संसदभवन परिसरातील अपार्टमेंटला भीषण आग!

PM Kisan 21th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिवाळी! 'या' तारखेला येणार PM किसानचा २१ वा हप्ता, पण ही चूक केल्यास मिळणार नाहीत पैसे

'कांतारा चॅप्टर १' अजूनही पाहिला नाही? आता घरबसल्या पाहता येणार; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

'लता मंगेशकर मात्र एकच घडली'... मीना मंगेशकर-खडीकर यांच्या लेखणीतून दीदीचा खडतर प्रवास आणि अनोख्या आठवणी!

Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT