Copa America
Copa America Twitter
क्रीडा

Copa : ब्राझीलनं 10 मॅनसह गाठली सेमी, मेस्सीचा संघही शर्यतीत

सुशांत जाधव

Copa America Semifinal : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. गतविजेत्या ब्राझीलने सेकंड हाफमध्ये 10 खेळाडूनिशी खेळतानाही चिलीचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला. लुकास पाकेटो याने दुसऱ्या हाफमध्ये केलेला गोल ब्राझीलसाठी निर्णायक ठरला. (Copa America Football Tournament Brazil Peru SemiFinal Uruguay Colombia Argentina Ecuador Race In Semi)

ब्राझीलच्या खात्यात गोल जमा झाल्यानंतर काही क्षणातच गॅब्रियल जीससला रेफ्रींनी रेड कार्ड दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी पाकेटाने 46 व्या मिनिटाला चिलीच्या गोली क्लाउडिओ ब्रावोला चकवा देत डाव्या बाजूने चेंडू गोलपोस्टमध्ये डागला होता. या गोलनिशी मिळालेली आघाडी ब्राझीलने 10 गड्यांसोबत खेळतानाही कायम राखली आणि सेमीफायनलमध्ये धडक मारली.

ब्राझीलला सेमीफायनलचे तिकीट मिळवून देण्यासाठी डिफेंडरनी सिंहाचा वाटा उचलला. ब्राझीलची मजबूत भिंत बनून त्यांनी चिलीची आक्रमण थोपवून लावले. त्यामुळे चिलीला सामन्यात कमबॅक करता आले नाही. ब्राझीलचा संघ सेमीफायनलमध्ये पेरु विरुद्ध खेळताना दिसेल. 2019 च्या कोपा अमेरिका फायनलमध्ये ब्राझील आणि पेरु यांच्यात फायनल झाली होती. त्यावेळी ब्राझीलने 3-1 अशी बाजी मारुन सामन्यासह कोपा स्पर्धा जिंकली होती. याच आत्मविश्वासाच्या जोरावर ते पुन्हा त्यांच्याविरुद्ध भिडतील. दुसरीकडे पेरुचा संघ मागील पराभवाचा वचपा काढून पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारण्यासाठी प्रयत्नशील असेल.

कोपा अमेरिका स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात पेनल्टी शूट आउटमध्ये दिमाखदार कामगिरी करत पेरुन सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. क्वार्टर फायनलमध्ये पराग्वे आणि पेरु यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला होता. पेनल्टी शूट आउटमध्ये पेरुन 4-3 अशी बाजी मारत स्पर्धेतील आपला प्रवास कायम ठेवला.

दुसऱ्या सेमीफायनलसाठी उरग्वे आणि कोलंबिया यांच्यातील एक संघ आणि मेस्सीचा अर्जेंटिना आणि इक्वेडोर यांच्यातील विजेता आपली जागा पक्की करेल. या चार संघातील कोणते दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहचणार हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT