KL Rahul esakal
क्रीडा

टीम इंडियासाठी खुशखबर, ताफ्यात लवकरच दाखल होणार हा खेळाडू

धनश्री ओतारी

भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार सलामीवीर केएल राहुल फिट होत आहे. राहुल आगामी दौऱ्यांमध्ये खेळू शकणार नाही, पण केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेपूर्वी कर्णधार राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यानंतर त्याची प्रकृती पाहता राहुल आगामी काही सामने खेळू शकणार नसल्याची माहिती वैद्यकीय पथकाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला दिली. तसेच तो, निर्धारित पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडलाही जाऊ शकणार नाही. असे सांगण्यात आले. दरम्यान, के एल राहुल फिट होत असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुलने नुकतंच कू अॅपवर काही फोटो शेअर करत 'माझ्यासाठी प्रार्थना करत राहा' असे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सध्या त्याने रिकव्हरीकडे त्याचे लक्ष केंद्रीत केले आहे.

बर्मिंगहॅममध्ये 1 जुलैला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 2-1 ने पुढे आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भारतीय संघ कसोटी मालिका मध्येच सोडून भारतात परतला होता. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामन्याव्यतिरिक्त 3 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

असा असणार भारताचा संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT