क्रीडा

World Cup 2023:मॅक्सवेल एकटा अफगाणिस्तानला नडला; 'ही' चूक अफगणिस्तानला ४ वर्ष लक्षात राहील

Manoj Bhalerao

Afganistan Vs Australia: विश्वचषक २०२३ स्पर्धेत अफगणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात अफगणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगणिस्तानने २९२ धावांचं आव्हान दिलं.

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेल्याच्या फलंदाजी ढेपाळली. मात्र, मधल्या फळीत खेळण्यासाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने किल्ला लढवला आणि ऑस्ट्रेल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचा एक झेल अफगणिस्तानच्या क्षेत्ररक्षकाकडून सुटला होता. या चुकीचा अफगणिस्तानला मोठा फटका बसला.

अफगणिस्तान संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगणिस्तानसाठी इब्राहिम झद्रान याने झंझावती शतक झळकावलं आणि नाबाद राहिला. त्याने १२९ धावा केल्या. यात ८ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्यानंतर अफगणिस्तानच्या फलंदाजांनी योगदान देत धावफलक सुरु ठेवला.

शेवटच्या काही षटकांत अष्टपैलू खेळाडू राशीद खान याने अवघ्या १८ चेंडूत ३५ धावा केल्या. यात २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. निर्धारित ५० षटकांमध्ये अफगणिस्तानने ५ गडी गमावत २९१ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ट्रॅविस हेड भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. मात्र, त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने सामन्याची समीकरणं बदलून टाकली. त्याने या सामन्यात झंझावती दुहेरी शतक झळकावलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT