Australia and Pakistan Cricket Sakal
क्रीडा

ठरलं! ऑस्ट्रेलिया 24 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यास 'राजी'

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौऱ्यासंदर्भात ( Australia Cricket Team Tour Of Pakistan) मोठी माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानला पाठवण्याचा निर्णय बोर्डाने घेतलाय. 1998 नंतर तब्बल 24 वर्षांनी ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानात खेळताना दिसेल. 4 मार्चपासून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वनडे आणि एकमेव टी-20 सामन्याचा समावेश आहे. (Cricket Australia have confirmed that Australia will travel to Pakistan for the first time in 24 years)

रावळपिंडीच्या मैदानातील कसोटी सामन्याने ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान ( Australia and Pakistan) दौऱ्याची सुरुवात होईल. दुसरा कसोटी सामना कराची आणि तिसरा कसोटी सामना लाहोरच्या मैदानात नियोजित आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निक हॉकले यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह (PCB) दोन्ही देशातील सरकारने दौऱ्याला दिलेल्या परवानगीबद्दल आभार मानले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, असोसिएशन, स्टाफ सदस्य आणि सुरक्षा तज्ज्ञ या सर्वांनी पाकिस्तान दौऱ्यासाठी केलेली तयारी कौतुकास्पद आहे. हा एक ऐतिहासिक दौरा असून जागतिक क्रिकेटला यामुळे चालना मिळेल, असा उल्लेखही निक हॉकले यांनी केलाय.

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. या दोन्ही संघाच्या निर्णयामुळे पाकिस्ता क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसाला. याशिवाय जागतिक स्तरावर त्यांची नाच्चकाहा झाली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानात जाऊन खेळण्याची तयारी दर्शवल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा मिळाला आहे.

4 मार्च ते 5 मार्च पहिला कसोटी सामना (रावळपिंडी)

12 मार्च ते 16 मार्च दुसरा कसोटी सामना (कराची)

21 मार्च ते 25 मार्च तिसरा कसोटी सामना (लाहोर)

29 मार्च पहिला वनडे सामना (रावळपिंडी)

31 मार्च दुसरा वनडे सामना (रावळपिंडी)

3 एप्रिल तिसरा वनडे सामना (रावळपिंडी)

5 एप्रिल एकमेव टी -20 सामना (रावळपिंडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

SCROLL FOR NEXT