क्रीडा

T-20 World Cup: टी-२० विश्वचषकात 'या'च खेळाडूने भारताचे नेतृत्व केले पाहिजे! सौरव गांगुलीने व्यक्त केले मत

टी-२० विश्वचषकात भारताच्या नेतृत्वाची कमान कोणत्या खेळाडूच्या हातात सोपवावी, याबाबत माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपले मत नोंदवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma T-20 World Cup: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात पार पडलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात शानदार कामगिरी करीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अचूक डावपेचांसमोर निष्प्रभ ठरल्यामुळे टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याच कारणामुळे आता भारतीय संघाची धुरा के.एल.राहुल, हार्दिक पंड्या यांसारख्या खेळाडूंकडे सोपवण्यात येण्याची चर्चा रंगू लागली.

क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मात्र रोहित शर्मा याच्याकडेच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व असायला हवे, असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच टी-२० विश्‍वकरंडकापर्यंत त्याच्या खांद्यावर ही धुरा सोपवण्यात यावी असेही आवर्जून सांगितले.

रोहित शर्मा व विराट कोहली यांनी विश्‍वकरंडक आटोपल्यानंतर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे दोघेही थेट दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळणार आहे. सौरव गांगुली दोघांबद्दल मत व्यक्त करताना म्हणाले की, रोहित व विराट हे आजही भारतीय क्रिकेट संघाचा आविभाज्य घटक आहेत. २०२२मधील टी-२० विश्‍वकरंडकानंतर दोघांनीही टी-२० क्रिकेट खेळलेले नाही. पण एकदिवसीय विश्‍वकरंडकात दोघांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे टी-२० विश्‍वकरंडकासाठी हे दोनही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.

पुजारा, रहाणेचे आभार

चेतेश्‍वर पुजारा व अजिंक्य रहाणे या अनुभवी क्रिकेटपटूंची आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. याबाबत सौरव गांगुली म्हणाले, भारतामध्येही प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही. निवड समिती सदस्यांना कसोटी क्रिकेटमध्येही नव्या चेहऱ्यांना संधी द्यावयाची आहे. त्यामुळे चेतेश्‍वर पुजारा व अजिंक्य रहाणे या दोन्ही कसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना वगळण्यात आले आहे. पुजारा व रहाणे यांनी भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान मौल्यवान आहे. यासाठी त्यांचे आभार मानतो, असे गांगुली सांगतात.(Latest Marathi News)

द्रविडवर विश्‍वास

राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी टी-२० विश्‍वकरंडकापर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. यावर सौरव गांगुली म्हणाले, मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदासाठी तयार केले. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. अंतिम फेरीचा अडथळा त्यांना ओलांडता आला नाही. पण आता जून महिन्यात टी-२० विश्‍वकरंडकाचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयकडून द्रविडवर विश्‍वास कायम ठेवण्यात आला आहे. त्याला मी शुभेच्छा देतो. (Latest Marathi News)

माझ्या नेतृत्वात भारतीय संघाने तीन वेळा आयसीसी स्पर्धांची अंतिम फेरी गाठली. पण त्यापैकी दोन वेळा आम्ही उपविजेता ठरलो. एक वेळा संयुक्त विजेते ठरलो. त्यामुळे आयसीसीचा करंडक जिंकण्यासाठी काय करायला हवे, याबाबत मी बोलणे योग्य ठरणार नाही. पण भारतीय संघ आगामी काळात नक्कीच आयसीसी स्पर्धा जिंकेल.- सौरव गांगुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT