Amit Bachchan 
क्रिकेट वर्ल्ड कप

Amitabh Bachchan: "तुमच्या प्रतिभेचं, कर्तुत्वाचं प्रतिबिंब..."; फायनलमधील पराभवानंतर महानायकाचं ट्वीट चर्चेत

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानं लोक सध्या टीमला मोटिवेट करत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानं लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून टीमला आधार देत आहेत मोटिवेट करत आहेत. त्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ट्वीट केलं असून ते सध्या चर्चेत आहे. (Amitabh Bachchan tweeted on Team India lossed final match of Cricket World Cup)

बच्चन यांनी काय म्हटलंय?

अमिताभ बच्चन यांनी थोड्यावेळा पूर्वीच ट्वीट केलं आहे. यात टीम इंडिया उद्देशून ते म्हणतात, "काल रात्रीच्या सामन्याचा निकाल हा तुमच्या टॅलेंटचं, क्षमतेचं आणि स्थिरतेचं प्रतिबिंब नव्हतं. पण मला तुमचा अभिमान आहे. भविष्यात टीमसाठी चांगल्या गोष्टी घडतील, असंच चांगलं खेळत राहा" (Latest Marathi News)

सेमी फायनलनंतर केलं होतं मजेशीर ट्वीट

वर्ल्डकपमधील सेमी फायनल मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झाली होती. यावेळी भारतानं जवळपास ४०० धावांचा डोंगर उभारला होता. त्यात न्यूझीलंडच्या संघाला नमवून शानदार विजयही मिळवला होता. या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी एक मजेशीर ट्वीट केलं होतं. कदाचित मी सामना पाहिला नाही त्यामुळं हा धमाकेदार विजय मिळाला, असं त्यांनी म्हटलं होतं. (Marathi Tajya Batmya)

बच्चन झाले ट्रोल

सेमी फायनलनंतरच्या ट्वीटचा संदर्भ देत भारताचा फायनलमध्ये पराभव झाल्यानं बच्चन यांना अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं. फायनलचा सामना तुम्ही पाहिला नाहीत ना? असा सवाल काहींनी केला. (Latest Marathi News)

कशी झाली फायनल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची फायनल झाली. यामध्ये भारतीय फलंदाजांची पहिली फळी लवकर बाद झाल्यानं तसेच नंतरच्या फलंदाजांनी अतिशय संथ खेळी केल्यानं भारताला २४० धावा करता आल्या. पण याला ऑस्ट्रेलियाच्या संघानं चोख उत्तर देत दमदार खेळ केला आणि विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT