क्रिकेट वर्ल्ड कप

Aus vs Eng T20 World Cup : मॅक्सवेलचा फॉर्म चिंतेचा विषय! ऑस्ट्रेलिया करणार इंग्लंडचा सामना

Australia vs England T20 World Cup 2024 : गतविजेत्या इंग्लंडला टी-२० विश्‍वकरंडकातील सलामीच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे एक गुण मिळाला, पण स्कॉटलंडविरुद्धच्या या लढतीत इंग्लंडच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यात आले.

Kiran Mahanavar

Australia vs England T20 World Cup 2024 : गतविजेत्या इंग्लंडला टी-२० विश्‍वकरंडकातील सलामीच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे एक गुण मिळाला, पण स्कॉटलंडविरुद्धच्या या लढतीत इंग्लंडच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यात आले. इंग्लंड संघाची ही कमकुवत बाजू प्रकर्षाने समोर आली. ब गटातील लढतीत त्यांच्यासमोर आज (ता. ८) दिग्गज संघ ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. याप्रसंगी इंग्लंडच्या संघाला गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.

इंग्लंडने स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत मार्क वूड, जोफ्रा आर्चर, मोईन अली, ख्रिस जॉर्डन, अदिल रशीद या गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये निवडले. या अनुभवी गोलंदाजांना स्कॉटलंडच्या सलामी फलंदाजांना बांधून ठेवता आले नाही. त्यामुळे साहजिकच त्यांना यावर मेहनत घ्यावी लागणार आहे. जॉस बटलर, फिल सॉल्ट या फलंदाजांना आयपीएलमधील फॉर्म कायम ठेवावा लागणार आहे, तसेच विल जॅक्स, हॅरी ब्रुक, जॉनी बेअरस्टो यांना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.

मॅक्सवेलचा फॉर्म चिंतेचा विषय

ऑस्ट्रेलियाने पहिल्या लढतीत ओमानला पराभूत केले, पण या विजयात ऑस्ट्रेलियाचा दरारा नव्हता. डेव्हिड वॉर्नर व मार्कस स्टॉयनिस वगळता त्यांच्या फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. गोलंदाजांनी या विजयात मोलाची भूमिका बजावली. ग्लेन मॅक्सवेलचा सुमार फलंदाजी फॉर्म ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय आहे. पॅट कमिन्सचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन होऊ शकते. पहिल्या लढतीत नॅथन इलिस याला संघात स्थान देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT