Australias David Warner receives the Player of the Tournament trophy
Australias David Warner receives the Player of the Tournament trophy  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: बाबरचं 'त्रिशतक' पाण्यात; वॉर्नर ठरला मॅन ऑफ द सीरीज!

सुशांत जाधव

T20 WC Final AUS vs NZ: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल लढतीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केले. ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयात डेविड वॉर्नरने (David Warner) मोलाचा वाटा उचलला. फायनल सामन्यात वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे 21 वे अर्धशतक ठरले. फायनल सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 30 धावांची खेळी करताना वॉर्नरने खास विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाकडून टी-20 वर्ल्ड कपपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला. मॅथ्यू हेडनने पहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 265 धावा केल्या होत्या. या हंगामात वॉर्नरने 7 सामन्यात 289 धावा केल्या.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने 6 सामन्यात 303 धावा केल्या. यंदाच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने 14 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेविरुद्ध त्याने स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले. 65 धावांची खेळी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंड विरुद्ध त्याला अवघ्या एका धावेवर माघारी फिरावे लागले. बांगलादेश विरुद्ध 18 धावा केल्यानंतर पुन्हा त्याने वेस्ट इंडीज विरुद्ध 89 धावांची धमाकेदार खेळी केली. पाकिस्तान विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकले होते. त्यानंतर फायनलमध्ये त्याने स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. या कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. बाबरच्या धावा अधिक असल्या तरी त्याच्या धावा या संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.

आयपीएल 2021 मध्ये एका एका धावेसाठी केला होता संघर्ष

2021 च्या आयपीएल स्पर्धेत वॉर्नरला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले होते. 8 सामन्यात त्याने केवळ 195 धावा केल्या होत्या. खराब कामगिरीमुळे त्याला सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वावरुन हटवण्यात आले. त्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याला स्थान मिळाले नाही. त्यामुळे वॉर्नरची कारकिर्द संपतेय की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वॉर्नरने आपल्या भात्यात अजूनही फटकेबाजी आहे हेच दाखवून देत ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT