Babar Azam Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Babar Azam : मैं क्या बोल रहा हैं तू क्या... इंग्रजी प्रश्न येताच बाबर गोंधळला भलतीकडेच भरकटला; Video व्हायरल

Babar Azam Video: अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम इंग्लिशमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचं भलतंच उत्तर देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Babar Azam: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला आपल्या मोहिमेची सुरुवात पराभवाने करावी लागली. पाकिस्तानला 6 जून रोजी डेलासला झालेल्या सामन्यात अमेरिका संघाने सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यांतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अत्यंत निराश दिसला.

निराश असतानाच तो सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला काही पत्रकारांनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले, यावेळी तो थोडा गोंधळलेला दिसला होता. यादरम्यानचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की एका पत्रकाराने बाबरला इंग्लिशमध्ये विचारले की हा एक अपसेट होता की खरंच अमेरिका खूप चांगले खेळले. तो प्रश्न कदाचीत बाबरला नीटसा कळाला नाही.

त्याने त्यावर उत्तर देताना म्हटले 'हो मी खूप अपसेट आहे. आम्ही या सामन्यातील तिन्ही विभागात अपयशी ठरलो. आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहोत, पण गोलंदाजीमध्ये आम्ही पहिल्या 6 षटकात जास्त विकेट्स घेऊ शकलो नाही.'

'मधल्या षटकात जर तुमच्या फिरकीपटूंनी विकेट्स घेतल्या नाहीत, तर तुमच्यावरील दबाव अधिक वाढतो. आमच्यावरही दवाब वाढला होता. 10 षटकांनंतर आम्ही या सामन्यात पुनरागमन केले, पण त्यांनी सुपर ओव्हरमध्ये आम्हाला मात दिली, त्याचे सर्व श्रेय अमेरिकेला द्यायला पाहिजे.'

या सामन्यात पाकिस्तानने 20 षटकात 7 बाद 159 धावा केल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेनेही 20 षटकात 3 बाद 159 धावाच केल्या. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर घेण्यात आली होती.

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 18 धावा केलेल्या, पण पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 1 बाद 13 धावाच करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, आता पाकिस्तानसाठी पुढील मार्ग कठीण झाला आहे. त्यातच त्यांचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारतीय संघाविरुद्ध होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्युयॉर्कमध्ये 9 जून रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT