Babar Azam Statement India vs Pakistan T20 World Cup 2024 SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Pak: 'आमची रणनीती सोपी होती पण...' भारताविरुद्ध पराभवानंतर कर्णधार बाबरने सांगितली कुठे झाली चुक?

Babar Azam Statement India vs Pakistan T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना पाहिला मिळाला.

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना पाहिला मिळाला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. या वर्ल्ड कपमधील सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कुठे चुक झाली हे सांगितले.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या संघाची कुठे चूक झाली हे सांगितले. सामन्यानंतर तो म्हणाला की, "आम्ही चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी करताना आम्ही विकेट गमावत राहिलो आणि बरेच डॉट बॉलही खेळलो. आमची खेळण्याची रणनीती सोपी होती. फक्त स्ट्राईक रोटेशन आणि काही चौकार. पण त्या काळात आम्ही खूप डॉट बॉल खेळलो.

बाबर पुढे म्हणाला की, "सुरूवातीला एक विकेट पडल्यानंतर पहिल्या सहा षटकांत आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. खेळपट्टी चांगली दिसत होती. आता आम्हाला शेवटचे दोन सामने जिंकायचे आहेत.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 19 षटकांत 10 गडी गमावून 119 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर पाकिस्तानच्या दिग्गजांनी नांग्या टाकल्या. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 3.50 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 14 धावा दिल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

या विजयासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांचे चार गुण झाले आहेत. त्याचबरोबर भारताचा नेट रन रेटही 1.455 झाला आहे. याशिवाय चालू स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

बाबर आझमच्या संघाला अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडता आलेले नाही. सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. 11 जून रोजी बाबर आझमचा संघ कॅनडाशी भिडणार आहे, तर 16 जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकातील 36 वा सामना खेळायचा आहे. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT