Virat Kohli T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli : 1, 4, 0... तीन सामन्यात फक्त 5 धावा! कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय? बॅटिंग कोच म्हणाले...

T20 World Cup 2024 Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला टी-२० विश्‍वकरंडकातील साखळी फेरीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे.

Kiran Mahanavar

Virat Kohli T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला टी-२० विश्‍वकरंडकातील साखळी फेरीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे. त्याच्या फलंदाजी फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे; मात्र भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी विराट कोहली पुढल्या फेरीत चांगली फलंदाजी करील, अशी आशा व्यक्त करतानाच तो अपयशाने आणखी एकाग्र झालाय, असे म्हटले आहे.

विराट कोहली असे व्यक्तिमत्त्व आहे की ज्याने कामगिरी केली तरी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले जातात आणि विराटला अपयश आले तरी प्रश्न विचारले जातात. या वेळी विक्रम राठोड हसत हसत म्हणाले, मला कल्पना आहे की लोक आत्ता का प्रश्न विचारत आहेत. विराटला तीन सामन्यात धावा करता आल्या नाहीत. एक सांगतो म्हणून आम्हाला एक कण दडपण आलेले नाही किंवा मनात शंका निर्माण झाल्या नाहीयेत.

विराटच्या बाबतीत मी इतकेच सांगेन की नेहमीच तो संघासाठी चमकदार कामगिरी करायला उत्सुक असतो. मला उलट एक चांगली गोष्ट दिसते आहे. विराटला थोडे अपयश आल्याने तो चांगली कामगिरी करायला अजून भुकेला झाला आहे. मला वाटते आहे की तो ‘सुपर आठ’ फेरीत धमाल कामगिरी करून दाखवेल. कारण तो कमाल मेहनत करतोय. सरावादरम्यान खूप सुंदर फलंदाजी करतोय आणि अर्थातच विराट जिद्दी आहे, असे विक्रम राठोड विश्वासाने म्हणाले.

तीन सामन्यांतील विजयानंतर भारतीय संघ चांगल्या लयीत आला असताना शेवटचा सामना पावसाने झाला नाही. म्हणजेच १२ जूननंतर आता ८ दिवसांच्या विश्रांतीने भारतीय संघ ‘सुपर आठ’ फेरीचा आपला पहिला सामना बार्बाडोसला खेळेल. भारतीय संघाला खरे तर ही विश्रांती नको होती. आता समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देत भारतीय संघ फ्लोरिडाहून बार्बाडोसचा प्रवास करून पुढच्या फेरीतील सामन्याच्या तयारीला लागणार आहे. फ्लोरिडाला भारतीय संघाचे हॉटेल सुंदर समुद्रकिनाऱ्यासमोर होते. खेळाडूंनी त्याचा थोडा फायदा घेऊन स्वच्छ समुद्राचा आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT