Quinton de Kock
Quinton de Kock  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Black Lives Matter : क्विंटन डी कॉकची थेट सामन्यातून माघार

सुशांत जाधव

वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार ब्रायन लारा यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. क्विंटन डी कॉकची माघार ही वेस्ट इंडीजसाठी सामना जिंकण्याची एक संधीच आहे, असे मत लाराने व्यक्त केले आहे.

South Africa vs West Indies : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात सामना रंगला आहे. सुपर 12 मधील ग्रुप 1 मधील हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. पण या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि स्टार फलंदाज क्विंटन डिकॉकन माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. वैयक्तिक कारणास्तव तो वेस्ट इंडीज विरुद्ध खेळणार नसल्याची माहिती टॉसवेळी कर्णधार टेम्बा बवुमा याने दिली. त्याच्या जागी रीझा हेन्ड्रिकला संघात स्थान देण्यात आल्याचे तो म्हणाला.

वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार ब्रायन लारा यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. क्विंटन डी कॉकची माघार ही वेस्ट इंडीजसाठी सामना जिंकण्याची एक संधीच आहे, असे मत लाराने व्यक्त केले आहे. एकंदरीत लाराच्या या वक्तव्यावरुन क्विंटन डी कॉकचे दक्षिण आफ्रिके संघातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. त्यामुळेच आयत्यावेळी त्याने कोणत्या वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली याची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

वर्णद्वेषाचा मुद्दा अन् दक्षिण आफ्रिका संघाची भूमिके यावरुन मतभेद?

गेल्या काही काळापासून वर्णद्वेषाच्या मुद्यावरुन जगभरात वातावरण तापल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. वर्ल्ड कप स्पर्धेतही Black Lives Matter च्या मोहिमेअंतर्गत मैदानात उतरल्यानंतर खेळाडू गुडघ्यावर बसून या मोहिमेअंतर्गत वर्णद्वेषासंदर्भात आवाज उठवत आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंनी या मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना मॅच अगोदर केल्या होत्या. कदाचित हाच मुद्दा क्विंटन डी कॉककला खटकला असावा. त्यामुळेच त्याने चक्क वेस्ट इंडीज विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला असावा.

Black Lives Matter विषयी काय आहे क्विंटन डी कॉकचे मत

कृष्णवर्णीयांनाही जगण्याचा अधिकार आहे, हे जगाला सांगण्यासाठी Black Lives Matter ही चळवळ सुरु झाली आहे. जगभरातून अनेक लोकप्रिय व्यावसायिक, खेळाडू या मोहिमेत सहभागी होत आहेत. वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये क्विंटन डी कॉकने या मोहिमेसंदर्भात मत मांडले होते. एखाद्या गोष्ट करण्यासाठी तुम्ही त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही. यासंदर्भात प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते. कोणीतरी सांगते म्हणून एखादी गोष्ट करायची हे पटत नाही, असे म्हणत त्याने Black Lives Matter मोहिम बळजबरीने कोणावर लादू नये, असे मत व्यक्त केले होते. वर्ल्ड कप स्पर्धेतील वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला या मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्यामुळेच त्याने माघार घेतल्याची दाट शक्यता वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT