क्रिकेट वर्ल्ड कप

Video: कर्णधार रोहितने विराटला दिली बॉलिंग, अन्...

विराज भागवत

स्मिथ फलंदाजी करताना विराटने टाकलेला चेंडू झपकन आत वळला..

T20 World Cup IND vs AUS Warm Up: भारताने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड विरोधात विजय मिळवला. त्यानंतर आज भरातचा दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू आहे. या सामन्यात विराट कोहली संघात असूनही रोहित शर्मा नाणेफेकीला आला. गेल्या सामन्यात विराट कोहली कर्णधार होता, पण रोहितला संघात स्थान देण्यात आले नव्हते. या सामन्यात मात्र विराट असूनही रोहितला कर्णधार करण्यात आले. त्यात आणखी मनोरंजक म्हणून कर्णधार रोहित शर्माने थेट पॉवर प्ले ची षटकं संपल्यावर विराट कोहलीला गोलंदाजी दिली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाची धावसंख्या ६ षटकामध्ये १ बाद ३४ अशी होती. त्यानंतर भारतीय संघाचा आजच्या सामन्याचा कर्णधार रोहित शर्मा याने विराट कोहलीला गोलंदाजीसाठी आणले. विराट कोहलीने आपल्या कर्णधाराचा विश्वास १०० टक्के सार्थ ठरवला. जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या स्टीव्ह स्मिथला विराट कोहलीने गोलंदाजी केली.

विराटने पहिल्या षटकातील दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर पुढील चार चेंडूत स्मिथ आणि मॅक्सवेल या दोघांनी प्रत्येकी १-१ धाव घेतली. त्यानंतर विराटला पुन्हा १३ वे षटक टाकण्यासाठी बोलावण्यात आले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून स्टॉयनीसने त्याला चौथ्या चेंडूवर चौकार लगावला. इतर चेंडूवर विराटने चांगली गोलंदाजी केली. विराटने २ षटकात १२ धावा देत चांगली कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT