Chris-Woakes-Catch 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC Video: ख्रिस वोक्सने हवेत उडी मारून घेतला भन्नाट कॅच!

स्टीव्ह स्मिथही वोक्सचा प्रयत्न पाहून काही काळ थबकला... | T20 World Cup 2021

विराज भागवत

स्टीव्ह स्मिथही वोक्सचा प्रयत्न पाहून काही काळ थबकला... | T20 World Cup 2021

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला २० षटकात केवळ १२५ धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जोस बटलरने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. ८ गडी आणि तब्बल ५० चेंडू राखून इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि गटातील आपली बाजू अधिक भक्कम केली. या सामन्यात ख्रिस जॉर्डनला सामनावीर ठरवण्यात आले तर बटलरच्या फटकेबाजीही चर्चा रंगली. पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ख्रिस वोक्सने पकडलेल्या कॅचची...

ख्रिस वोक्स ३० यार्ड वर्तुळात फिल्डिंग करत होता. २ षटकात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १ बाद ८ होती. अशा वेळी ख्रिस जॉर्डनने आखूड टप्प्याचा चेंडू स्टीव्ह स्मिथला टाकला. स्मिथने चेंडू पाहताच त्यावर प्रहार करायचा ठरवला. पण उसळीचा अंदाज न आल्याने स्टीव्ह स्मिथचा फटका चुकला. स्मिथचा फटका ३० यार्डच्या वर्तुळाला पार करणार असं वाटत असतानाच ख्रिस वोक्सने मागच्या बाजूला धावून जात अतिशय चपळाईने हवेत झेप घेतली आणि कॅच टिपला. त्याच्या कॅचची साऱ्यांनीच तोंडभरून स्तुती केली.

पाहा तो झेल...

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १२५ धावा केल्या. कर्णधार आरोन फिंचने एक बाजू लावून धरत ४४ धावांची झुंजार खेळी केली. पण त्याला कोणाचीही हवी तशी साथ लाभली नाही. ख्रिस जॉर्डनने केवळ १७ धावांत ३ बळी टिपले आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूंग लावला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी जोस बटलरने ऑस्ट्रेलियावर हल्लाबोलच केला. त्याने नाबाद राहत ३२ चेंडूत ७१ धावा कुटल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: जळगावात भाजपाचे तीन सदस्य बिनविरोध विजयी

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT