Hardik Pandya video call Natasa Stankovic sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Hardik Pandya Video Call : टी-20 वर्ल्ड कप जिंकताच हार्दिक पांड्याने कोणाला केला व्हिडिओ कॉल? नताशा की दुसरी कुणीतरी...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. संघाच्या या विजयात उपकर्णधार हार्दिक पंड्याचे योगदानही महत्त्वाचे होते, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली.

Kiran Mahanavar

Hardik Pandya video call after India beat South Africa : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. संघाच्या या विजयात उपकर्णधार हार्दिक पंड्याचे योगदानही महत्त्वाचे होते, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली.

टीमने टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकताच हार्दिक पांड्या व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसला. यानंतर आता सर्व चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, हार्दिक पांड्या व्हिडिओ कॉलवर कोणासोबत बोलत होता. हार्दिक पांड्या त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकशी बोलत होता की काय, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

खरं तर, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट झाल्याची अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून होती. या संदर्भात दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु सोशल मीडियावर त्यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या सतत येत होत्या. नताशा स्टॅनकोविकने जे काही फोटो शेअर केले, लोकांनी त्यावर अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली.

मात्र, या सगळ्यामध्ये हार्दिक पांड्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळण्यात व्यस्त होता. त्याने या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात हार्दिकने 3 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. एका महत्त्वाच्या वळणावर त्याने तुफानी फलंदाजी करणाऱ्या हेन्रिक क्लासेनची विकेट घेतली. याशिवाय त्याने डेव्हिड मिलरसारख्या धोकादायक खेळाडूची विकेटही घेतली.

भारतीय संघ चॅम्पियन होताच अनेक खेळाडू आपल्या कुटुंबीयांशी बोलताना दिसले. यादरम्यान हार्दिक पांड्या व्हिडीओ कॉलवर कोणाशी तरी बोलताना दिसला. मात्र, तो कोणाशी बोलत होता हे स्पष्ट झाले नाही आणि त्यामुळेच अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

या फोटोवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. कोणी म्हणाले की, हार्दिकने त्याचा भाऊ कृणाल पांड्याला फोन केला होता तर कोणी म्हणाला की तो त्याच्या आईशी बोलत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राची धक्का गर्ल प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT