ENG vs NZ
ENG vs NZ Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

ENG vs NZ : नंबर वन इंग्लंडला नमवत न्यूझीलंडनं गाठली फायनल

सुशांत जाधव

England vs New Zealand 1st Semi Final : डॅरेल मिशेलची अर्धशतक आणि जेम्स निशमनं केलेली फटकेबाजी याच्या जोरावर न्यूझीलंडने फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 166 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मार्टीन गप्टिल आणि केन विल्यमसन स्वस्तात माघारी फिरल्यानंतर ड्वेन कॉन्वे आणि मिचेल यांनी संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकात जेम्स निशमने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली. तो बाद झाल्यानंतर डॅरेलम मिशेलनं संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदाच फायनल गाठली आहे.

इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मार्टिन गप्टीलला क्रिस वोक्सने अवघ्या 4 धावांवर तंबूत धाडले. केन विल्यमसनलाही त्याने 5 धावांवर बाद केले. ही जोडी माघारी फिरल्यानंतर डॅरेल मिशेलनं ड्वेन कॉन्वेच्या साथीनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं 82 धावांची भागीदारी केली. लिविंगस्टोननं ही जोडी फोडली.

कॉन्वे 38 चेंडूत 46 धावा करुन बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या ग्लेन फिलिप्सलाही लिविंगस्टोननं स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर जेम्स निशमने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिला. त्याने 11 चेंडूत 27 धावांची खेळी करत डावाला कलाटणी दिली. आपल्या या खेळीत त्याने 1 चौकार आणि 3 षटकार खेचले. दुसऱ्या बाजूला मिशेल 47 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 72 धावांवर नाबाद राहिला.

नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जोस बटलर (29) आणि जॉनी बेयरस्टो (13) धावांवर बाद झाल्यानंतर डेविड मलान 41 (30) आणि मोईन अलीच्या 37 चेंडूतील 51 धावांच्या जोरावर इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 4 बाद 166 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून साउदी, मिल्ने, ईश सोधी आणि निशम यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT