Fazalhaq Farooqi | Afghanistan Cricket Team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: अफगाणिस्तानच्या 23 वर्षीय गोलंदाजाचा 5 विकेट्ससह मोठा पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

Fazalhaq Farooqi: टी20 वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानच्या पहिल्याच सामन्यात 23 वर्षीय गोलंदाजाने भेदक मारा करत 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Pranali Kodre

Afghanistan vs Uganda: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानने युगांडाविरुद्ध 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला. गयाना येथे झालेल्या या सामन्यातील विजयासह अफगाणिस्तानच्या या स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात झाली आहे.

अफगाणिस्तानच्या या विजयात मध्यमगती गोलंदाज फझलहक फारुकीने मोठे योगदान दिले. त्याच्या भेदक माऱ्यासमोर युगांडाचा संघ संघर्ष करताना दिसला. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 9 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याच्या नावावर मोठा विक्रमही झाला आहे.

अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर राशिद खान असून त्याने आयर्लंडविरुद्ध 2017 साली ग्रेटर नोएडाला झालेल्या सामन्यात 3 धावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच पुरुषांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही 23 वर्षीय फझलहक चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अ्वल क्रमांकावर अजंता मेंडिस आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 2012 मध्ये 8 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

पुरुषांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज

  • 6 विकेट्स/8 धावा - अजंता मेंडिस (श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, 2012)

  • 5 विकेट्स /3 धावा - रंगना हेराथ (श्रीलंका विरुद्ध न्युझीलंड, 2014)

  • 5 विकेट्स /6 धावा - उमर गुल (पाकिस्तान विरुद्ध न्युझीलंड, 2009)

  • 5 विकेट्स /9 धावा- फझलहक फारुकी (अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा, 2024)

  • 5 विकेट्स /10 धावा - सॅम करन (इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, 2022)

अफगाणिस्तानचा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 183 धावा केल्या होत्या. त्यानंतर 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा संघ 16 षटकात 58 धावांवर सर्वबाद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT