Gautam Gambhir India Head Coach Update sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

India Head Coach : मुहूर्त ठरला तर मग.... गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार टीम इंडियाच्या कोचचा पदभार, BCCI करणार घोषणा

Gautam Gambhir India Head Coach Update : कोलकाता नाईट रायडर्सचे मार्गदर्शक आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य कोच होणार हे निश्चित झाले आहे.

Kiran Mahanavar

India Head Coach Update : टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोचचा शोध या महिन्याच्या अखेरीस संपू शकतो. कोलकाता नाईट रायडर्सचे मार्गदर्शक आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य कोच होणार हे निश्चित झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय या महिन्याच्या अखेरीस टीम इंडियाचा कोच म्हणून गंभीरची अधिकृत घोषणा करेल.

रिपोर्ट्सनुसार, गौमत गंभीरने बीसीसीआयला त्याचा सपोर्ट स्टाफ आणण्यास सांगितले आहे. सध्या विक्रम राठोड हे टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत, तर पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप द्रविडच्या सपोर्ट स्टाफचा एक भाग आहे. जर गंभीर प्रशिक्षक झाला तर या सगळ्यांची पण सुट्टी होईल.

टी-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार

भारतीय संघाचे विद्यमान मुख्य कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपणार आहे. बीसीसीआयने काही काळापूर्वी नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. दरम्यान, राहुल द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत गौतम गंभीरच्या नावासह अनेक नावे या शर्यतीत सामील होती.

गौतम गंभीर केकेआरचा मेंटर

गौतम गंभीर सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आहे. तो मेंटर बनल्यानंतर पहिल्या सत्रातच केकेआरला जेतेपद पटकावण्यात यश आले. यानंतर गंभीर टीम इंडियाचा कोच होणार या बातम्यांनी वेग घेतला. स्वत: गंभीरनेही सांगितले की, त्याच्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा कोणताही मोठा सन्मान नाही. जर त्याला संधी मिळाली तर तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू इच्छितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT