Australia Cricket Team T20 World Cup 2024 Semi Final Scenario sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AUS Super-8 : भारताकडून हारल्यानंतर पण ऑस्ट्रेलिया जाणार सेमी-फायनलमध्ये; जाणून घ्या ग्रुप A मधील समीकरणे?

Australia Cricket Team T20 World Cup 2024 Semifinal Scenario : ऑस्ट्रेलियन संघाला अफगाणिस्तानविरुद्ध 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा सामना गमावल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

Kiran Mahanavar

Australia Cricket Team T20 World Cup 2024 Semifinal Scenario : ऑस्ट्रेलियन संघाला अफगाणिस्तानविरुद्ध 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा सामना गमावल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्धच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे.

24 जून रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तिने सामना गमावला तरी उपांत्य फेरी गाठणे तिला शक्य आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने सुपर-8 मध्ये आतापर्यंत एकूण 2 सामने खेळले आहेत, त्यापैकी अमेरिकेविरुद्ध त्याने विजय मिळवला आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना गमावला आहे. ऑस्ट्रेलियाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा नेट रन रेट अधिक आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट प्लस 0.223 आहे आणि त्याच्या दोन धावा आहेत.

गट एकमधील समीकरण

- भारतीय संघाने अखेरच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास टीम इंडियाचा संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर राहील, तसेच ऑस्ट्रेलियाचे आव्हान अशा परिस्थितीत जवळपास संपुष्टात येईल. तरीही मंगळवारी होणार असलेल्या बांगलादेश-अफगाणिस्तान यांच्यामधील लढतीच्या निकालाची त्यांना वाट बघावी लागणार आहे.

- ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला पराभूत केल्यास या गटातून भारतासह ऑस्ट्रेलियन संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी अधिक प्रमाणात असणार आहे.

- जर ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्धचा सामना हरला तर अशा स्थितीत भारतीय संघ प्रथम 6 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

- तर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे 2-2 समान गुण आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्धचा सामना हरेल, अशी प्रार्थनाही त्याला करावी लागेल. या स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ चांगल्या नेट रन नेटसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

- अफगाणिस्तानने बांगलादेशला नमवल्यास आणि भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास या गटातून भारतासह अफगाणिस्तानचा संघ पुढल्या फेरीत पोहोचेल.

- भारत, ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान या तीनही संघांचे समान चार गुण झाल्यास ज्या संघांचा नेट रनरेट चांगला असेल, तेच संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

- भारताने ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने हरवल्यास व बांगलादेशने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने नमवल्यास अशा परिस्थितीत भारतासह बांगलादेशलाही पुढील फेरी गाठता येणार आहे, पण बांगलादेशला पुढल्या फेरीत पोहोचण्याची अंधुकशी संधी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT