Namibia vs Ireland  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

नामिबीया Super 12 साठी क्वॉलिफाय; भारताच्या गटात झाला समावेश

अ गटातील अव्वलस्थानी असलेला श्रीलंकेचा संघ पहिल्या गटात खेळताना दिसेल.

सुशांत जाधव

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता सामन्यात आयर्लंडला पराभूत करत नामिबीयानं Super 12 साठी पात्रता मिळवली आहे. श्रीलंकेपाठोपाठ अ गटात ते दुसऱ्या स्थानावर राहिले. आयर्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 8 बाद 125 धावा केल्या होत्या. या धावा नामीबीयानं 8 गडी आणि 9 चेंडू राखून सहज पार केल्या. सुपर 12 मध्ये नामीबीया भारताच्या गटात म्हणजेच दुसऱ्या गटात खेळताना दिसेल. अ गटातील अव्वलस्थानी असलेला श्रीलंकेचा संघ पहिल्या गटात समाविष्ट झाला आहे.

ऑयर्लंडच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर स्टर्लिंगच्या 24 चेंडूतील 38 धावा,केविन ऑबरायन 24 चेंडूत 25 धावा आणि कर्णधार बलबिरने 21 धावा वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद 125 धावांपर्यंतच मजल मारता आली. नामीबीयाकडून जॅन फ्रायलिनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. विसेला दोन बळी मिळाले.

मोजक्या धावसंख्येचा पाठलाग करताना क्रॅग विल्यम्स 15 आणि झॅन ग्रीन 24 या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. ही जोडी माघारी फिरल्यानंतर कर्णधार गेरहार्ड इरासम्सच्या नाबाद 53 धावा आणि डेविड विसेच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर नामिबीयाने विजय नोंदवला. अ गटातील नेदरलंडचा प्रवास या आधीच संपुष्टात आला होता. तर श्रीलंकेनं या गटातून अव्वलस्थानी राहत स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवली होती. आयर्लंड आणि नामिबीया यांच्यातील विजेता सुपर 12 साठी पात्र ठरणार होता. यात आयर्लंडला स्पर्धेतून बाद करत नामिबीयाने बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT