India Vs Pakistan T20 World Cup 2024  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

India Vs Pakistan : भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला बसला मोठा धक्का; स्टार खेळाडूच मुकणार?

T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा पाय आधीच खोलात आहे. त्यात आता स्टार अष्टपैलू खेळाडूच भारताविरूद्ध खेळणार नसल्यानं त्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 चा सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत - पाकिस्तान सामना हा रविवारी न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. त्यात युएसएने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारताविरूद्धच्या सामन्याकडं सर्वांच विशेष लक्ष आहे.

दरम्यान, पहिल्याच सामन्यात पराभव पाहिलेल्या पाकिस्तानला आता भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वीच एक मोठा धक्का बसला. त्यांचा अष्टपैलू खेळाडू इमाद वासिम भारताविरूद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. इमाद युएसएविरूद्धच्या सामन्यात देखील साईड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे मुकला होता. आता तो भारताविरूद्धच्या सामन्याला देखील मुकण्याची दाट शक्यता आहे.

बीबीएन स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार वसिमला पेन किलर इंजक्शन देऊन भारत - पाकिस्तान सामन्यापर्यंत फिट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याचा काही फायदा होताना दिसत नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार इमाद वासिम हा भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही हे जवळपास 80 टक्के नक्की झालं आहे. मेहरान मुमताझने लाहोर येथील एनसीएमध्ये आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्याला स्टँड बाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे. आता भारताविरूद्धच्या सामन्यात युवा सैम आयुब मोहम्मद रिझवान सोबत सलामी देण्याची शक्यता आहे.

यापूर्वी बाबर आझम म्हणाला होता की, 'जरी इमादने पहिला सामना खेळला नसला तरी आम्ही तो पुढच्या सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल अशी आशा करत आहोत.'

पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर झमान, हारिक रौऊफ, इफ्तिकार अहमद, इमाद वासिम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT