IND vs PAK T20 World Cup 2024 news sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK T20 World Cup : भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का! स्टार अष्टपैलू जखमी, 'या' सामन्यातून बाहेर

Imad Wasim Injured News : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

Kiran Mahanavar

IND vs PAK T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम दुखापतग्रस्त असल्याने तो 6 जून (गुरुवार) रोजी होणाऱ्या अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यानंतर पाकिस्तानलाही तीन दिवसांनी भारताचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत इमादची दुखापत ही पाकिस्तानसाठी चांगली बातमी नाही.

अमेरिकेविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात इमादच्या अनुपलब्धतेची पुष्टी करताना, कर्णधार बाबर आझम म्हणाला की, "इमाद वसीमला साइड स्ट्रेनमध्ये थोडा त्रास होत आहे, त्यामुळे तो सलामीच्या सामन्याला मुकणार आहे.

त्यामुळे भारताविरुद्ध त्याच्या खेळण्याबाबतही शंका आहेत. कारण दोन दिवसांत त्याचे सामन्यासाठी तंदुरुस्त होणे कठीण होते. मात्र, अष्टपैलू खेळाडू टी-20 वर्ल्डकपतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळेल, अशी आशा बाबरला आहे.

बाबर म्हणाला, इमाद पहिला सामना खेळणार नसला तरी उर्वरित सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल अशी आम्हाला आशा आहे. इमादच्या अनुपस्थितीमुळे पाकिस्तान संघाच्या अमेरिकेविरुद्धच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानचा दुसरा सामना 9 जून रोजी भारताशी होणार आहे. हा सामनाही फक्त न्यूयॉर्कमध्येच खेळवला जाईल.

पाकिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप 2024 संघ : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान , शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता, राज ठाकरे पोलिसांच्या संपर्कात, नेमकं काय घडतंय?

Shiv sena Pune Election: पुण्यात शिवसेनेची युती तुटली? १२३ जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार? पडद्यामागे काय घडलं?

Sangli Election : ‘माघार घे, तुला कॉप्ट करतो! ’महापालिका निवडणुकीत नेत्यांचे नवे गाजर; सांगलीत ‘स्वीकृत’ राजकारण चर्चेत

Latest Marathi News Live Update : पुण्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

धक्कादायक! नववर्षानिमित्त मिठाई देण्यासाठी घरी बोलावलं अन् प्रेयसीनं चाकूनं प्रियकराचं गुप्तांगच कापलं, मुंबईत काय घडलं?

SCROLL FOR NEXT