IND vs PAK CWC 2023 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK CWC 2023: नव्या पिढीतल्या फॅन्सचा जल्लोष; टीम इंडियावर फिदा झालेल्या चिमुकल्यांचा डान्स व्हायरल

भारतानं पाकिस्तानला दोनशे धावांच्या आतच रोखल्यानं भारतीय चाहते उत्साहित असून आत्ताच त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

गुवाहाटी : किक्रेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये पहिलाच सामना होत आहे. गुजरातच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. पाकिस्तानला 192 धावांवर रोखण्याची चांगली कामगिरी टीम इंडियानं केली आहे.

भारतीय खेळाडूंच्या या जबरदस्त खेळावर नव्या पिढीतले फॅन्सही फिदा झाले आहेत. गुवाहाटी इथं सामना पाहणाऱ्या टीनएजर्सनं अक्षरशः जल्लोष केला. याचा व्हिडिओ एएनआयनं ट्विट केला आहे. (IND vs PAK CWC 2023 New generation fans cheer up to Team India dance video viral of children)

यंदाच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडं आहे. त्यामुळं भारतीयांसाठी ही खऱ्याअर्थानं मेजवाणी आहे. आजचा भारत-पाकिस्तानचा सामना हा 12 सामना असून दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा पहिलाच सामना आहे. (Latest Marathi News)

या सामन्याला मिळणारा प्रतिसाद पाहता देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम अशी ख्याती असलेल्या अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडतोय. त्याला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. टीम इंडियानं देखील दबरदस्त खेळी करत आपल्या फॅन्सला नाराज केलेलं नाही. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, भारतानं पाकिस्तानला 192 धावांमध्ये रोखल्यानंतर आता भारताला जिंकण्यासाठी 193 धावा करायच्या आहेत. एकतर टार्गेट कमी करण्यात यशस्वी ठरण्याबरोबरच यासाठी साजेसा खेळ केल्यानं भारतीय चाहते टीम इंडियावर जाम खूश आहेत.

देशभरात तरुणांनी आत्ताचं जल्लोष करायला सुरुवात केली आहे. आसामची राजधानी गुवाहाटी इथं नव्या पिढीतल्या छोट्या फॅन्सनं जल्लोष केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

असा झाला सामना

भारताने वर्ल्डकप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा डाव 191 धावात संपुष्टात आणत सामन्यावर पकड निर्माण केली. भारताकडून प्रमुख पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकिस्तानी फलंदाजीचं कंबरडं मोडलं.

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 तर मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचत भारताला टेन्शन दिले होते. मात्र मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी पाकिस्तानची मधील फळी उडवली. त्यानंतर पांड्या आणि जडेजाने शेपुट गंडाळत पाकिस्तानचा डाव 43 षटकात संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT