Rishabh-Pant-Urvashi-Rautela 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: हॉट उर्वशी रौतेला ऋषभ पंतसोबत ट्रेंडिंगमध्ये...

विराज भागवत

पंत अन् उर्वशी यांचं नक्की काय आहे प्रकरण, वाचा

India vs Pakistan, T20 World Cup 2021: भारतीय संघाने पाकिस्तान (Ind vs Pak) विरूद्धच्या टी२० वर्ल्ड कप सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५१ धावा केल्या. हे आव्हान पाकिस्तानच्या फलंदाजांनी १० गडी राखून पूर्ण केले. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारताला दीडशतक गाठता आले होते. त्याच्या व्यतिरिक्त ऋषभ पंतने (Rishabh Pant) ३९ धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऋषभ पंत त्याच्या खेळीसोबतच एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत तो ट्वीटरवर ट्रेंडिग असल्याचे दिसले. (Ind vs Pak Hot Actress Urvashi Rautela Trending with Rishabh Pant Photos Viral See Tweets)

पंत- उर्वशीमध्ये नक्की काय आहे प्रकरण

क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्याबद्दल गॉसिप होणं हे काही नवीन नाही. मधल्या काळात ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनीही याबद्दल काहीच उत्तर दिलं नाही. काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत याने उर्वशीला व्हॉट्सअपवर ब्लॉक केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच, ऋषभ पंतच्या वाढदिवशी तिने त्याला थेट ट्वीटरवर शुभेच्छा दिल्या होत्या. या साऱ्या घटनांमुळे त्यांच्यात नक्कीच काही तरी सुरू आहे असा अंदाज चाहत्यांनी बांधायला सुरूवात केली. त्यातच आज भारत-पाक सामन्यादरम्यान उर्वशी सामना पाहायला स्टेडियममध्येदेखील हजर होती. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे ट्रेंडिंगमध्ये आल्याचं दिसून आले.

पाहा त्यापैकी काही निवडक ट्वीट्स...

दरम्यान, भारतीय कर्णधार विराटच्या खेळीला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने दमदार खेळी केली. त्याने रिझवान मोहम्मद रिझवानला उत्तम साथ दिली. मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. बाबर आझमनेही नाबाद ६८ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले. या दोघांनी १८व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT