IND vs AFG Playing 11 T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs AFG Playing 11 : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल? सुपर-8 फेरीत आज अफगाणिस्तानशी सामना

India vs Afghanistan Playing 11 T20 World Cup 2024 : टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या सुपर आठ फेरीस सुरुवात झाली आणि आज भारताचा मुकाबला फिरकी गोलंदाजीत प्रबळ असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे.

Kiran Mahanavar

India vs Afghanistan Playing 11 T20 World Cup 2024 : टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या सुपर आठ फेरीस सुरुवात झाली आणि आज भारताचा मुकाबला फिरकी गोलंदाजीत प्रबळ असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. भारताचे पारडे जड असले तरी अफगाण संघासमोर सावध खेळ करावा लागणार आहे.

अफगाणिस्तान संघाने गेल्या काही वर्षात टी-२० क्रिकेट प्रकारात लक्षणीय सुधारणा करून भल्या भल्या संघांच्या नाकी दम आणलेला आहे. त्यातच सध्याच्या काळात विंडीजमधल्या खेळपट्ट्यांचा स्वभाव अभ्यासता फिरकी गोलंदाज परिणाम साधण्याच्या तयारीत असणार असे वाटते. अफगाणिस्तानच्या दर्जेदार फिरकी माऱ्‍याचे आव्हान समर्थपणे पेलायला भारतीय संघातील फलंदाज उत्सुक आहेत.

भारतीय संघाने न्यूयॉर्कच्या मैदानावर अमेरिकेविरुद्ध सामना खेळला आणि त्यानंतरचा कॅनडा समोरचा सामना पावसाने रद्द झाला. परिणामी भारतीय संघ आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर सामना खेळणार आहे. याचा थोडा फायदा आहे, तसा थोडा तोटाही वाटतो. फायदा असा की, सलग सामन्यांच्या संभाव्य दगदगीच्या सुपर आठ फेरीअगोदर भारतीय संघाची विश्रांती पूर्ण झाली आहे. तोटा असा की, तीन सामन्यात चांगला खेळ करून विजय मिळवून खेळाची जी लय सापडली होती त्याला काहीशी खीळ बसली आहे.

बार्बाडोसला येऊन भारतीय संघाने तीन जोरदार सराव सत्र केली. अमेरिकेत क्रिकेट वगैरे सगळे ठीक होते, पण तिथल्या खेळपट्ट्या आणि बाहेरील मैदान धोकादायक होते. लोकांना खेळपट्टीबाबत समजले. खरी अडचण बाहेरील मैदानाची होती. तिथे पाय फसत होता, पळताना भीती वाटत होती. बार्बाडोसला आल्यावर बरे वाटते आहे. आमच्यातील बरेच खेळाडू गेल्यावर्षी विंडीज दौऱ्‍यावर येऊन खेळून गेले होते. म्हणून इथल्या वातावरणाची आणि खेळपट्टीची आम्हाला थोडी कल्पना आहे, रोहित शर्मा मैदानावर सरावानंतर म्हणाला.

दर्जेदार खेळाडू राशीद खानच्या नेतृत्वाखालचा अफगाणिस्तान संघ ताकदवान समजला जातो. संघातील बहुतांशी खेळाडूंना टी-२० क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. चार पाच खेळाडू आयपीएल खेळत असल्याने त्यांच्यातील सुधारणा लक्षणीय आहे. राशिद खान आणि मोहंमद नबी संघाचे अनुभवी आधार आहेत. सोबतीला रेहमतुल्ला गुरबझ आणि नूर अहमद सारखे अत्यंत गुणवान खेळाडू आहेत. नवा चेंडू चांगला स्वींग करणारा नवीन उल हक संघाला दिशा देतो. एकंदरीत अफगाणिस्तान संघ लढत देण्याची पूर्ण तयारी करून सुपर आठ फेरीत आला आहे.

कुलदीपचा समावेश शक्य

भारतीय संघाला यशाचा मार्ग शोधायचा झाल्यास अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर हल्ला चढवावा लागेल. खासकरून त्यांच्या फिरकी गोलंदाजांचे आव्हान पेलावे लागेल. आम्ही त्याच आव्हानाला तोंड द्यायला तयार आहोत, या शब्दात सूर्यकुमार यादवने भरवसा दिला. सराव नीट अभ्यासता भारतीय संघात बदल झाला, तर एकमेव बदल कुलदीप यादवच्या समावेशाचा होऊ शकतो, असे दिसत होते.

केन्सींग्टन ओव्हल मैदानावरची खेळपट्टी भारतीय संघाच्या सामन्यासाठी चांगली असावी म्हणून प्रयत्न केले जात होते. माती नीट बसावी आणि खेळपट्टी शक्य तेव्हढी टणक असावी म्हणून खेळपट्टीवर चक्क उभ्याबरोबर आडवे रोलींगही केले जात होते. बार्बाडोसचा सामना बघायला विशेषकरून अमेरिकेतून क्रिकेटप्रेमी दाखल झालेले दिसले. थोडक्यात भारतीय संघाच्या सुपर आठ फेरीतील पहिल्या सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. पावसाच्या अंधुक शक्यतेचा अपवाद वगळता रंगणारा सामना बघायची ओढ सगळ्यांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT