ICC names umpires for India vs England semifinal SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

ICCची मोठी घोषणा! टीम इंडियाची 'पनौती' अंपायरपासून सुटका; IND vs ENG सेमीफायनलमध्ये कोण असणार पंच?

ICC names umpires for India vs England semifinal : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये यंदा उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे.

Kiran Mahanavar

India vs England T20 World Cup 2024 2nd Semi-Final Umpires : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये यंदा उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे.

ज्यामध्ये टीम इंडिया वर्ल्ड कपचा दुसरा सेमीफायनल सामना खेळणार आहे. हा सामना 27 जून रोजी गयाना येथे इंग्लंड विरुद्ध होणार आहे. यासोबतच अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी त्रिनिदाद येथे रात्री 8.30 वाजता आणि 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या दोन्ही बाद फेरीच्या सामन्यांसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या सामन्यासाठी पंच कोण?

ICC नुसार, रिचर्ड इलिंगवर्थ आणि नितीन मेनन हे अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदानावरील पंच म्हणून काम पाहतील. या सामन्यात टीव्ही पंच म्हणून रिचर्ड केटलबरो, तर अहसान रझा हा चौथा पंच असेल.

भारत आणि इंग्लंड या सामन्यासाठी पंच कोण?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात ख्रिस गॅफनी आणि रॉडनी टकर हे मैदानावरील पंच म्हणून काम पाहतील. जोएल विल्सन या सामन्यात टीव्ही पंच तर पॉल रीफेल चौथा पंच म्हणून काम पाहतील.

रिचर्ड कॅटलबरो अंपायरपासून टीम इंडियाची सुटका

रिचर्ड केटलबरोचे अनेक निर्णय भारतीय संघाच्या विरोधात गेले आहेत. विशेष म्हणजे रिचर्डचे हे निर्णय केवळ बाद फेरीत भारताविरुद्ध गेले आहे. त्यामुळे तो टीम इंडियासाठी फारच अशुभ सिद्ध झाला आहे.

रिचर्ड कॅटलबरो यांनी 2023 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पंचाची भूमिकाही बजावली होती. तर केटलबरो 2019 च्या उपांत्य फेरीतही मैदानात पंच म्हणून काम पाहत होते. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यातही इंग्लंडचे रिचर्ड कॅटलबरो मैदानावर पंचाची भूमिका बजावत होते. 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतही केटलबरो हे पंच होते.

हे उपांत्य फेरीचे पंच असतील

दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान (त्रिनिदाद): २६ जून

  • पंच : रिची रिचर्डसन

  • ग्राउंड पंच : नितीन मेनन आणि रिचर्ड इलिंगवर्थ

  • टीव्ही अंपायर : रिचर्ड केटलबरो

  • चौथा अंपायर : अहसान रझा

भारत विरुद्ध इंग्लंड (गियाना): 27 जून

  • पंच : जेफ्री क्रो

  • ग्राउंड अंपायर : रॉडनी टकर, ख्रिस गॅफनी

  • टीव्ही अंपायर : जोएल विल्सन

  • चौथा अंपायर : पॉल रेफेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT