India vs Pakistan 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: भारत-पाक सामन्याचे समालोचन मराठीतून!

विराज भागवत

मनसेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: टी२० वर्ल्ड कप मॅचच्या समालोचनाचा आनंद आता मराठीमध्ये घेता येणार आहे. हॉटस्टारने वर्ल्डकपचे समालोचन मराठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी यासाठी प्रयत्न केले होते. २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप मॅचचे समालोचन मराठीत सुरू होणार आहे. मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे.

IPL 2021 स्पर्धा नुकतीच संपली आणि याचे समालोचन इतर भाषांसोबत मराठीत व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टारसोबत पत्रव्यवहार केला. यात त्यांनी IPL चे समालोचन मराठीत करावे याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर हॉटस्टारने नुकत्याच झालेल्या सामान्यांचे समालोचन मराठीत केले.

त्यानंतर आता वर्ल्ड कपचे समालोचन मराठीत व्हावे, अशीही मागणी केतन नाईक यांनी केली होती. मात्र, हॉटस्टारने या वर्षी ही मागणी पूर्ण होऊ शकणार नसल्याची माहिती ट्विट करत दिली होती. तरीही मनसेने ती मागणी लावून धरली. अखेर, २४ ऑक्टोबरला हॉटस्टारवर सुरू होणारा टी २० वर्ल्ड कपचा पहिला सामना भारत-पाकिस्तान असून तेव्हापासूनच मराठीत कॉमेंट्री सुरू होणार आहे, याबाबत हॉटस्टार ने ट्विट करून माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT