IND vs PAK T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK : न्यूयॉर्कमध्ये टॉस असणार बॉस; नाणेफेक जिंकून कोणता निर्णय घेणं आहे फायद्याचं?

IND vs PAK T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात असतो प्रचंड दबाव. त्यामुळं नाणेफेक ठरणार अत्यंत महत्वाची

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला पुन्हा एकदा लढत होत आहे. टी 20 वर्ल्कपची सुरूवात 2007 पासून झाली आहे. पहिला वर्ल्डकप हा दक्षिण आफ्रिकेत झाला होता. त्यावेळी भारत - पाकिस्तान दोनवेळा एकमेकांसमोर आले होते. त्यानंतर टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारत - पाकिस्तान हे पाचवेळा एकमेकांसमोर आले आहेत.

विशेष म्हणजे या पाचहीवेळा दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. पाकिस्तानने 2021 मध्ये भारताचा पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पराभव केला. त्यावेळी देखील पाकिस्तानने टोटल चेस केली होती. दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची शक्यता 71 टक्के इतकी आहे. जर टी 20 सामन्यांच रेकॉर्ड काढलं तरी भारत - पाकिस्तान एकूण 12 वेळा भिडले आहेत. त्यातील 9 सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे आता न्यूयॉर्कमधील सामन्यात टॉस जिंकून दोन्ही कर्णधार काय करणार हा मोठा प्रश्न आहे.

नाणेफेक इतकी का म्हत्वाची?

- टी 20 क्रिकेटमध्ये जवळपास सर्व सामने हे रात्री खेळवले जातात. तिथं दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला दवबिंदूंचा फायदा मिळतो. चेंडू ओला झाला तर तो स्विंग आणि स्पिन देखील होत नाही. त्यामुळं फलंदाज अधिक मोकळेपणाने खेळू शकतात. मात्र ९ जूनचा भारत - पाक सामना हा सकाळी होणार आहे. तो भारतात रात्री आठ वाजता दिसणार आहे.

- भारत - पाकिस्तान सामन्यात कायम प्रचंड दबाव असतो. अशावेळी जो संघ प्रथम फलंदाजी करतो त्यावर अतिरिक्त ताण येतो. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना टार्गेट किती आहे हे माहिती असतं. त्यामुळे फलंदाजी करताना रणनिती स्पष्टपणे आखता येते.

- न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचेस आहेत. या खेळपट्ट्या ऑस्ट्रेलियातून आणण्यात आल्या आहेत. या खेळपट्ट्या सेट होण्यासाठी जवळपास एक वर्ष घेतात. मात्र अमेरिकेत या खेळपट्ट्या काही आठवडे आधीच आणल्या असल्याने या खेळपट्ट्यांवर टीका होत आहे.

या खेळपट्टीवर चेंडू असमान उसळत आहे. तसेच चेंडू भरपूर स्विंग होतोय. आऊट फिल्ड देखील प्रचंड संथ आहे. सकाळी गोलंदाजांना मदत मिळते. जसजसा सूर्य डोक्यावर येऊ लागतो तसतशी खेळपट्टी फलंदाजीला पोषक होत आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणं इथंही फायद्याचं आहे.

(Cricket News Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT