Virat-Kohli-Six 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK Video: विराटने आफ्रिदीला डोक्यावरून मारला सिक्स!

तुम्ही पाहिलात का कोहलीचा भन्नाट शॉट?

विराज भागवत

तुम्ही पाहिलात का कोहलीचा भन्नाट शॉट?

India vs Pakistan, T20 World Cup 2021: पाकिस्तानविरूद्ध भारताने (Ind vs Pak) टॉस गमावला आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) प्रथम फलंदाजीला उतरली. रोहित शर्मा (Rohit Sharma) शून्यावर तर केएल राहुल (KL Rahul) 3 धावांवर बाद झाला. या दोघांनाही शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) इनस्विंग चेंडू टाकत माघारी पाठवलं. चेंडू इनस्विंग होत असताना विराटने (Virat Kohli) मात्र त्याच्या गोलंदाजीची भीती बाळगली नाही. स्विंग चेंडूवर विराटने स्टंपपासून थोडासा बाहेरच्या दिशेला गेला आणि त्याने थेट आफ्रिदीच्या डोक्यावर सणसणीत षटकार लगावला. (India vs Pakistan Video Virat Kohli big six to Shaheen Afridi T20 World Cup 2021)

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, भारताच्या संघाने फॉर्मात असलेल्या इशान किशनला संघात स्थान दिले नाही. भारतीय संघाचा पहिला सराव सामना इंग्लंडविरोधात होता. त्यावेळी इशान किशनने नाबाद ७० धावांची दमदार खेळी केली होती. पण आजच्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही. त्यासोबतच अनुभवी रविचंद्रन अश्विन यालाही संघात संधी मिळाली नाही. त्याजागी युवा वरूण चक्रवर्तीला संधी मिळाली. तसेच, गोलंदाजीबाबत साशंक असलेल्या हार्दिक पांड्यावर कोहलीने शार्दूलपेक्षा अधिक विश्वास दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT