Jasprit Bumrah Ind vs Pak sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Jasprit Bumrah Ind vs Pak : अहमदाबाद ते न्यूयॉर्क...! जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा कर्दनकाळ

सहा महिन्यात दोनदा जसप्रीत बुमरा पाकिस्तानी संघासाठी विश्वकरंडक स्पर्धेत कर्दनकाळ ठरला आहे. अहमदाबाद असो वा न्यूयॉर्क पाकचे फलंदाज बुमरासमोर शरण आल्याचे स्पष्ट झाले.

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah : सहा महिन्यात दोनदा जसप्रीत बुमरा पाकिस्तानी संघासाठी विश्वकरंडक स्पर्धेत कर्दनकाळ ठरला आहे. अहमदाबाद असो वा न्यूयॉर्क पाकचे फलंदाज बुमरासमोर शरण आल्याचे स्पष्ट झाले.

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात बुमराने १९ धावांत २ विकेट मिळवून सामन्याला कलाटणी दिली होती, तर रविवारी ९ जून रोजी न्यूयॉर्क येथे झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत बुमराने १४ धावांत ३ विकेट मिळवल्या आणि पाक संघासाठी होत्याचे नव्हते केले. विशेष म्हणजे बुमरा या दोन्ही सामन्यांत सर्वोत्तम ठरला.

विश्वकरंडकमध्ये भारताचे वर्चस्व

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ८-० असे निर्विवाद वर्चस्व असलेल्या भारताने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आता ७-१ अशी आपली हुकूमत राखली आहे.

एखाद्या प्रतिस्पर्ध्यावर मिळवलेले विजय (विश्वकरंडक)

  • ७ ः भारत वि. वि. पाकिस्तान

  • ६ ः पाकिस्तान वि. वि. बांगलादेश

  • ६ ः श्रीलंका वि. वि. वेस्ट इंडीज

पाकविरुद्ध कमी धावांचे संरक्षण

  • ११८ ः झिम्बाब्वे (हरारे २०२१)

  • ११९ ः भारत (न्यूयॉर्क २०२४)

  • १२७ ः ऑस्ट्रेलिया (मेलबर्न २०१०)

  • १२९ ः इंग्लंड (अबुधाबी २०१२)

  • १३० ः झिम्बाब्वे (पर्थ २०२२)

विश्वकरंडकमध्ये कमी धावांचे संरक्षण

  • ११९ ः श्रीलंका वि न्यूझीलंड (चतोरग्राम २०१४)

  • ११९ ः भारत वि. पाकिस्तान (न्यूयॉर्क २०२४)

  • १२३ ः अफगाणिस्तान वि. विंडीज (नागापूर २०१६)

  • १२६ ः न्यूझीलंड वि. भारत (नागपूर २०१६)

  • १२८ ः दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंड (लॉर्डस २००९)

टी-२० प्रकारात भारताकडून कमी धावांचे संरक्षण

  • ११९ ः विरुद्ध पाकिस्तान (न्यूयॉर्क २०२४)

  • १३८ ः विरुद्ध झिम्बाब्वे (हरारे २०१६)

  • १४४ ः विरुद्ध इंग्लंड (नागपूर २०१७)

  • १४७ ः विरुद्ध बांगलादेश (बंगळुरू २०१६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Premanand Maharaj: विराट-अनुष्कासारखं प्रेमानंद महाराजांना भेटायचंय? जाणून घ्या खर्च किती

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यात 25 ई डबल डेकर बस

SCROLL FOR NEXT