India vs Pakistan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

Misbah ul Haq: पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने आपल्याच संघाला कोणत्या भारतीय खेळाडूंपासून धोका आहे, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Pakistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारी (2 जून) सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्याची सध्या जोरदार चर्चा देखील आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्युयॉर्कमध्ये सामना होणार आहे. अशात या सामन्याबद्दल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन सिंग, इरफान पठाण आणि मिस्बाह-उल-हकने आपापली मतं मांडली आहेत.

यावेळी मिस्बाहने पाकिस्तानसाठी सर्वात मोठा अडसर ठरू शकणाऱ्या भारतीय खेळाडूबद्दलही भाष्य केले. मिस्बाह 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार होता. या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद मिळवले होते.

मिस्बाहला यंदा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका कोणापासून असू शकतो असे विचारले असता कोणताही संकोच न करता त्याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव घेतले.

मिस्बाह म्हणाला, 'भारत-पाकिस्तान सामन्यात हे खूप महत्त्वाचे ठरेल की किल्ला कोण आधी सर करेल, कोणाकडे हा आत्मविश्वास असेल की आपल्या देशासाठी आधी सामने जिंकवले आहेत, कारण त्या खेळाडूंना माहिती आहे की दवाब कोणत्या स्तरावर जाऊ शकतो.'

'दबावाला कसे सांभाळायचे, याबाबतीत तरी सर्वात मोठा अडथळा विराट कोहलीचाच असेल. तो एक असा खेळाडू आहे, ज्याने अनेकदा कठीण परिस्थितीतही प्रतिस्पर्धी संघांकडून विजय खेचून आणला आहे.'

मिस्बाह म्हणाला, असे खेळाडू नेहमीच धोकादायक असतात, याबाबत विचार व्हायला हवा, पाकिस्तानलाही या गोष्टी लक्षात यायला हव्यात.

याशिवाय मिस्बाहने गोलंदाजांबद्दलही भाष्य करताना जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले. त्याने म्हटले की भारतासाठी बुमराह या स्पर्धेत त्याची छाप पाडेल. मिस्बाह म्हणाला, 'मला गोलंदाजीबाबत जसप्रीत बुमराह आवडतो. गोलंदाजीत तो अनुभवी खेळाडू आहे.'

'मर्यादीत षटकांच्या बाबतीत तो नवीन आणि जुन्या चेंडूने ज्याप्रकारे गोलंदाजी करतो, ते पाहाता तो नक्कीच त्याची छाप पाडू शकतो. तो भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सुरुवातीचे पंच पाकिस्तानला तोच मारू शकतो.'

दरम्यान, या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ पहिल्या फेरीसाठी अ गटात आहेत. या गटात त्यांच्यासह अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT