Best Fielding Medal India vs Ireland T20 World Cup 2024 News ेोकोत
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs IRE Best Fielding Medal : कोहली, जडेजा नाही तर... 'या' खेळाडूला मिळाले बेस्ट फील्डिंग मेडल; ड्रेसिंग रूमचा Video Viral

India vs Ireland T20 World Cup 2024 News: टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात केली. गोलंदाजांनी आयर्लंडला 100 धावांत रोखले. यानंतर फलंदाजीत संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी कमाल केली. आणि 13व्या षटकातच फलंदाजांनी लक्ष्य गाठले.

Kiran Mahanavar

IND vs IRE Best Fielding Medal : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात केली. गोलंदाजांनी आयर्लंडला 100 धावांत रोखले. यानंतर फलंदाजीत संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी कमाल केली. आणि 13व्या षटकातच फलंदाजांनी लक्ष्य गाठले.

या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी खेळली. याशिवाय पंतने 36 धावांची नाबाद खेळीही खेळली. सामन्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण खूप आनंददायी आहे. संघातील स्टार खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार मिळाला आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 पासून भारतीय संघाला सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी पुरस्कार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतही प्रत्येक सामन्यातील विजयानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला देण्यात आला, त्यामुळे खेळाडूंनी मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी अधिक मेहनत घेतली.

आता हाच ट्रेंड आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्येही सुरू झाला आहे. आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर ड्रेसिंग रुमचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयर्लंड सामन्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे.

सहसा, जेव्हा चांगल्या क्षेत्ररक्षणाचा विचार केला जातो. तेव्हा चाहत्यांना असे वाटते की ते एकतर रवींद्र जडेजा किंवा विराट कोहलीकडे जाईल. सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात चांगले प्रयत्न केले असले तरी सिराजला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार मिळाला आहे.

केवळ क्षेत्ररक्षणातच नाही तर सिराजने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. आयर्लंडविरुद्ध सिराजने 3 षटकांत केवळ 13 धावा देत एक विकेट घेतली. भारतीय संघाने या आयसीसी स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. आता टीम इंडियाचा पुढचा सामना ९ जूनला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

Illegal Hoarding : अनधिकृत होर्डिंग्जवर आजपासून ‘सर्जिकल स्ट्राइक’; अतिक्रमण, बेवारस वाहने हटविणार

Mumbai Mhada: मुंबईतील 'या' इमारती म्हाडाच्या होणार, रहिवाशांना भाड्याचा पर्याय; नेमकी योजना काय?

करावं तसं भरावं! मैत्रिणीचा संसार मोडून तिच्या नवऱ्याशी केलेलं लग्न; ४ वर्षातच घेतला घटस्फोट; किती घेतली पोटगी?

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

SCROLL FOR NEXT