MS-Dhoni-Chris-Gayle 
क्रिकेट वर्ल्ड कप

धोनी अन् ख्रिस गेलच्या फोटोची होतेय चर्चा, वाचा काय आहे प्रकरण

विराज भागवत

भारताने पहिल्या सराव सामन्यात मिळवला विजय

T20 World Cup India vs England Warm up Match: लोकेश राहुल (५१) आणि इशान किशन (७०) या सलामी जोडीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने सराव सामन्यात विजय मिळवला. इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताने १८९ धावांचे आव्हान ६ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवला. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो (४९), मोईन अली (४३) आणि लियम लिव्हिंगस्टोन (३०) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने १८८ धावांपर्यंत मजल मारली. भारताने हे आव्हान १९ षटकांत पार केले. या सामन्याआधी एक झकास फोटो व्हायरल झाला.

भारताचा सोमवारी इंग्लंडविरूद्ध सामना रंगला होता. त्याआधी विंडिजविरूद्ध पाकिस्तानचा सराव सामना रंगला होता. या सामन्यादरम्यान भारताचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी आणि विंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल यांची भेट झाली. त्यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विटरवर बराच व्हायरल झाला. BCCI ने त्यांचा हा फोटो ट्विट करत दोन महान क्रिकेटपटूंची भेट असं त्याला कॅप्शनही दिलं.

दरम्यान, टी२० विश्वचषक संघाची ज्यावेळी घोषणा करण्यात आली. तेव्हा त्यासोबतच धोनी संघाचा मेंटॉर असेल याबद्दलही माहिती BCCI चे सचिव जय शाह यांनी दिली होती. नुकतीच धोनीच्या संघाने IPL ट्रॉफी जिंकली. खेळाडूच्या भूमिकेतील धोनी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये कशाप्रकारे काम करेल याकडे सध्या साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यातच, BCCI ने रविवारी एक फोटो पोस्ट केला होता. त्यात धोनीचा मेंटॉर म्हणून काम करतानाचे दोन फोटो पोस्ट करण्यात आले होते. या फोटोला, "किंग'चे टीम इंडियामध्ये स्वागत. धोनी टीम इंडियामध्ये परत आला आहे आणि आता तो नव्या भूमिकेत आहे", असे कॅप्शन देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT