Natasa Stankovic Drops A Cryptic Video God Protect Me After Hardik Pandya Returned To India Pradnyesh Otari
क्रिकेट वर्ल्ड कप

Natasa Stankovic post viral :देवा माझं रक्षण कर... पांड्या मायदेशी परतताच पत्नी नताशाचा क्रिप्टिक मेसेज

पांड्या मायदेशी परतताच पत्नी नताशाच्या पोस्टने सोशल मीडियात खळबळ

सकाळ डिजिटल टीम

Natasa Stankovic post viral : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार रंगली आहे. अशातच अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे. सर्वत्र पुन्हा जल्लोष करण्यात येत आहे. अशातच पांड्याची पत्नी नताशाने एक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे. तिच्या या पोस्टमुळं चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

नताशाने रील पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती लिपिस्टीक लावताना दिसत आहे. हा रील शेअर करताना एक मेसेजदेखील नताशाने लिहिला आहे.

नताशाने नेमकं काय म्हटलं आहे?

देवा मी जेव्हा संकटात असते तेव्हा मला त्यातून बाहेर काढ आणि जेव्हा संकटात नसते तेव्हा माझं रक्षण कर असा आशय नताशाने व्हिडीओवर शेअर केला आहे.

यापूर्वीही नताशाने अशीच पोस्ट केली होती. त्यामध्ये तिनं “मी आज एक अशी गोष्ट वाचली की ज्याची मला खरोखरच गरज होती. म्हणूनच हे बायबल मी माझ्याबरोबर कारमध्ये घेऊन आले जेणेकरून मला ते तुम्हाला सगळ्यांना वाचून ऐकवता येईल.' तसेच ती पुढे म्हणाली, ‘तुमच्याआधी, तुमच्यानंतर व तुमच्या बरोबर देवच कायम असणार आहे. तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही किंवा दूर करणार नाही. म्हणूनच तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. अस म्हटल होतं.

तिच्या या दोन्ही पोस्टचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पण नताशाने हार्दिक मायदेशी परतताच केलेल्या पोस्ट मुळं दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर आला आहे. मात्र दोघांनी याबाबत कोणतही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

टी २० विश्वचषक जिंकल्यावर भारतीय चाहत्यांनी केलेलं सेलिब्रेशन तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराह, सूर्या यांनी आपापल्या कुटुंबासह मैदानात व सोशल मीडियावर हा आनंद साजरा केला. पण हार्दिक पांड्या एकटाच दिसला. नताशा स्टॅनकोव्हिक हिने कोणतीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT