Hardik Pandya Natasa Stankovic Divorce esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Hardik Pandya Divorce : नताशा स्टॅन्कोविकने इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट केली अन् हार्दिकसोबतचे सर्व फोटो....

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याची पत्नी अभिनेत्री नताशासोबत घटस्फोट घेत असल्याच्या अफवांना उत आला होता. नताशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पांड्या हे आडनाव आणि हार्दिकचे सर्व फोटो हटवले होते. त्यानंतर तिने एक क्रिप्टिक स्टोरी देखील शेअर केली होती.

मात्र आता नताशाने पुन्हा एकदा क्रिप्टिक पोस्ट करत हार्दिकसोबतचे आपले सर्व फोटो पुन्हा इन्स्टाग्रामवर रिस्टोअर केले आहेत. असं वाटतं की नताशाने फोटो डिलीट करण्याऐवजी ते हाईड केले होते. त्यानंतर त्यांना अर्काइवमध्ये ठेवले होते. आता सेटिंगमध्ये जाऊन ते पुन्हा रिस्टोअर करण्यात आले आहेत.

मुद्दाम पसरवली अफावा?

या सर्व घडामोडीनंतर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांचं नातं पुन्हा सुधारलं आहे किंवा हे नातं कधी खराब झालं नव्हतच. हा सर्व एक प्रसिद्ध साठी केलेला उपद्वाप होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पांड्या आयपीएलमध्ये खराब कामगिरी करत होता. त्याला स्टेडियममध्ये सातत्याने हूटिंगचा सामना करावा लागला. यापासून सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं का?

ज्यावेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी काढून घेत ती हार्दिक पांड्याकडे देण्यात आली. त्यावेळी चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी हार्दिक पांड्याविरूद्ध मोर्चाच उघडला होता.

घटस्फोटाची चर्चा कधी झाली सुरू?

एका रेड्डीट पोस्टवर एका युजरने नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट झाला आहे का असे प्रश्न विचारला. त्या पोस्टनंतर सर्वांचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले. त्यानंतर नताशाच्या इन्स्टाग्रामवरील आडनावाबद्दल सर्वांनी चर्चा केली. तिच्या इन्स्टावरचे हार्दिकचे सर्व फोटो डिलीट करण्यात आल्याचे यावेळी सर्वांच्या लक्षात आलं अन् घटस्फोटाच्या चर्चेला जास्तच ऊत आला.

आयपीएल 2024 दरम्यान, मुंबई इंडिन्सचा कर्णधार झालेल्या हार्दिकचा सामना पाहण्यासाठी नताशा उपस्थित नव्हती. नताशाचा वाढदिवस हा 4 मार्चला असतो त्यावेळी हार्दिककडून कोणतीच पोस्ट करण्यात आली नाही. नताशाने देखील हार्दिक आणि आपल्या पोस्ट हटवल्या होत्या. त्यांनी अगस्तसोबतचे दोघांचे फोटो मात्र तसेच ठेवले होते.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पती-पत्नीच्या गुप्त कॉल रेकॉर्डिंगलाही पुरावा मानलं जाणार; हायकोर्टाचा निकाल रद्द करत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

IND vs ENG 3rd Test: शांत होता, उगाच डिवचले! जोफ्रा आर्चरने भन्नाट चेंडूवर रिषभ पंतचा उडवला दांडा, Video

त्या कुणाला जास्त जवळ येऊ द्यायच्या नाहीत... 'खुदा गवाह'च्या 'पाशा'ने सांगितलं सेटवर कशा वागायच्या श्रीदेवी

Crime News : कंपनी कामगार निघाला सोनसाखळी चोर: झटपट पैशांसाठी करायचा चैनस्नॅचिंग

Uttarakhand : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर CM धामी यांची नवी योजना; जाणून घ्या काय आहे ‘लिगेसी प्लॅन’

SCROLL FOR NEXT