IND-vs-PAK-Babar-Azam
IND-vs-PAK-Babar-Azam 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC IND vs PAK : "शाब्बास पाकिस्तान, यालाच म्हणतात..."

विराज भागवत

भारत-पाक सामन्यावर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केलं ट्विट

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र कालच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने एकही गडी बाद न होऊ देता सहज पार केलं. पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने पाकिस्तानचं कौतुक करत भारतीय चाहत्यांना थोडंसं नाराज करणारं ट्वीट केलं.

मायकल वॉनने तीन महत्त्वाची ट्विट्स केली. सर्वप्रथम त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या झुंजार खेळीचं कौतुक केलं. जागतिक स्तरावर जे खेळाडू महान असतात ते महत्त्वाच्या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करतात. विराट कोहलीने पुन्हा एकदा तो महान खेळाडू असल्याचं सिद्ध केलं. वॉनने बाबर आझमचंही कौतुक केलं. बाबर आझम हा सध्याच्या घडीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे, असंही वॉन म्हणाला. पण तिसरं ट्वीट मात्र त्याने भारतीयांना थोडंसं नाराज करणारं केलं. "पाकिस्तानी संघाचं अभिनंदन. तुम्ही चांगला खेळ केलात. यालाच म्हणतात लोकप्रिय आणि बड्या संघांना दणका देणं... अप्रतिम फलंदाजी... झक्कास!", असं ट्वीट त्याने केलं.IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र कालच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने एकही गडी बाद न होऊ देता सहज पार केलं. पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मारो मुझे मारो या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तरूणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालो.

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा केल्या. विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच सामना जिंकवला. रिझवानने नाबाद ७९ धावा तर कर्णधार बाबर आझमने ६८ धावा केला. त्यामुळे पाकिस्तानने वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा भारताला पराभूत केले. तसेच, वर्ल्ड कपमधील भारत-पाक सामन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा संघ दहा गडी राखून जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT