harbhajan singh and sumaira khan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

पाक महिला जर्नलिस्टची भज्जीनं घेतली फिरकी

एका पाकिस्तानी महिला क्रिकेटरने असिफने मारलेल्या षटकारांचा दाखला देत भज्जीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्धचा ऐतिहासिक विजय पाकिस्तानी माजी खेळाडू आणि फॅन्ससह पत्रकारांना पचनी पडल्याचे दिसत नाही. एका बाजूला पाकिस्तानचा संघ स्पर्धेत दमदार कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूला काही वाचाळवीर भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगला ट्रोल करताना पाहायला मिळते. भज्जीही त्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते.

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामना 5 विकेट्स राखून जिंकत पाकिस्तान संघाने स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. असिफ अलीने या सामन्यात 4 षटकार खेचले. भज्जीने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या धोनी स्टाईल फिनिशिंचे कौतुकही केले. पण एका पाकिस्तानी महिला क्रिकेटरने असिफने मारलेल्या षटकारांचा दाखला देत भज्जीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाला अखेरच्या 12 चेंडूत 24 धावांची आवश्यकता होती. असिफ अलीने चार षटकार खेचत 19 व्या षटकातच अफगाणिस्तानचा खेळ खल्लास केला. त्याच्या या खेळीचं भज्जीन ट्विटच्या माध्यमातून कौतुक केले. अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेण्यास नकार देऊन असिफ अलीने आपल्यातील स्फोटक फटकेबाजी दाखवून दिली. त्याचा आत्मविश्वास कमालीचा होता, असे ट्विट हरभजन सिंगने केले होते.

हरभजन सिंगच्या या ट्विटवर पाकिस्तानी महिला पत्रकार सुमैरा खानने खोडकरपणा दाखवला. भज्जीला टॅग करत तिने पुन्हा एकदा चार षटकार, असे लिहित वाकओव्हर हवा का? असा प्रश्न उपस्थितीत करत विनाकारण भज्जीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटनंतर शांत बसेल तो हरभजन कसला. त्यानेही या महिला पत्रकाराला सभ्य भाषेत सडेतोड उत्तर दिले. भज्जीन एक स्क्रीनशट शेअर केलाय. ‘Keep rolling your eyes maybe you’ll find a brain back there.’ असे लिहित किमान एवढं इंग्लिश कळत असेल. अशा शब्दांत भज्जीनं पाक महिला पत्रकाराची फिरकी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत पाणी प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक

Sangli News: ‘आधी मोबदला द्या; मगच वावरात पाय ठेवा’; विटा-बस्तवडे मार्गावर शेकापतर्फे मोर्चा

Asia Cup 2025: भारतीय संघात पुरेशी संधी न मिळण्याबाबत Kuldeep Yadav व्यक्त होणारच होता, पण अचानक माईक बंद झाला अन्...

Maratha Reservation : प्रमाणपत्र मिळाले तरी वैधता कठीण, जीआर कोर्टात टिकणार का? संभाजी ब्रिगेडला शंका

Ichalkaranji Politics : इचलकरंजीत शिंदे गट, भाजपचे टेन्शन वाढवणार? ३५ जागांची केली चाचपणी; महायुतीसाठी वजनदार मंत्र्यांच्या घरी बैठक

SCROLL FOR NEXT