Quinton de Kock  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: एका सामन्यात बाहेर; आता क्विंटन डी कॉकचा मोठा निर्णय

कृष्णवर्णीयांना पाठिंबा देण्याबद्दल मांडलं रोखठोक मत | Quinton De Kock Statement

विराज भागवत

कृष्णवर्णीयांना पाठिंबा देण्याबद्दल मांडलं रोखठोक मत | Quinton De Kock Statement

Quinton De Kock on Black Lives Matter: टी२० विश्वचषक स्पर्धेत विंडिजविरूद्ध दक्षिण आफिकेने आपला पहिला सामना खेळला. त्या सामन्यात आफ्रिकेने दमदार विजय मिळवला. पण त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक खेळला नव्हता. कृष्णवर्णीयांच्या हक्कांबाबत सुरू असलेल्या मोहिमेसंदर्भात त्याने सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण असं असलं तरी टी२० विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी तो उपलब्ध असणार आहे, असं डी कॉकने स्पष्ट केलं. विंडिजविरूद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक संघाबाहेर बसला होता. त्यावेळी त्याने वैयक्तिक कारणास्तव सामन्याला मुकल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता यापुढील सर्व सामन्यांमध्ये तो संघाकडून खेळणार असल्याची माहिती दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ICCला दिली.

"मी माझ्या संघातील सहकाऱ्यांची आणि चाहत्यांची माफी मागतो. ज्या लोकांना माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्या कुटुंबात सर्व वर्णाची लोकं आहेत. माझ्या काही बहिणी या वेगळ्या वर्णाच्या आहेत. तर माझी सावत्र आई कृष्णवर्णीय आहे. कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांसाठी सध्या Black Lives Matter ही मोहिम चालवली जात आहे. पण माझ्यासाठी मी जेव्हा जन्माला आलो तेव्हापासूनच ही मोहिम आणि कृष्णवर्णीयांचे जीव महत्त्वाचे आहेत", असं क्विंटन डी कॉकने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

"मला लहानपणापासून हेच शिकवण्यात आलंय की आपल्या साऱ्यांनाच मूलभूत हक्क आहेत. आणि ते सर्व हक्क अतिशय महत्त्वाचे आहेत. जेव्हा सामना सुरू होण्याआधी गुडघ्यावर बसून BLM ला समर्थन देण्याबद्दल मला सांगण्यात आलं तेव्हा मला असं वाटलं की माझे हक्क हिरावून घेतले जात आहेत. त्यामुळे मी तसा निर्णय घेतला होता", असंही डी कॉकने नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिककरांना सतर्कतेचा इशारा

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT